Manoj Jarange Maratha Reservation LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तासातच दरे गावातून मुंबईला रवाना
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या मराठा बांधवांचे पाऊस आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे हाल होत आहेत.
LIVE

Background
Maratha Reservation Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.अश्यात अजून ही आंदोलकांची प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्याने सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आज काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे उद्या (1 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मुलाच्या गाडीवरही हल्ला, गाडीचे टायर फोडले
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मुलाच्या गाडीवरही हल्ला .. हाके यांच्या वर निरा येथे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी कळताच त्यांचा मुलगाही त्यांना भेटायला निघाला असताना हडपसरच्या पुढे वडकी येथे मुलाच्या गाडीवर हल्ला करून गाडीचे टायर फोडून टाकले आहे.























