एक्स्प्लोर
कल्याणमध्ये तरुणीची हत्या करुन तरुणाची आत्महत्या, प्रेमसंबंधातून घटना घडल्याचा अंदाज
वेटरने जेवण देण्यासाठी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र बराच वेळ कुणीही प्रतिसाद न दिल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता आत तरुणाचा गळफास घेतलेला तर तरुणीचा खाली पडलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला.
कल्याण : तरुणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका गेस्ट हाऊसमध्ये हा प्रकार घडला. अरुण गुप्ता असं यातल्या मृत तरुणाचं, तर प्रतिभा प्रसाद असं यातील मृत तरुणीचं नाव आहे.
अरुण हा मूळचा आझमगडचा असून आज दुपारी तो या गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 204 मध्ये राहायला आला होता. तर संध्याकाळच्या सुमारास त्याच्याच खोलीत प्रतिभा प्रसाद ही 20 वर्षीय तरुणी राहायला आली होती. संध्याकाळी 9 वाजेच्या दरम्यान वेटरने जेवण देण्यासाठी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र बराच वेळ कुणीही प्रतिसाद न दिल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता आत तरुणाचा गळफास घेतलेला तर तरुणीचा खाली पडलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला.
याबाबतची माहिती मिळताच एमएफसी पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
पुणे
राजकारण
शेत-शिवार
Advertisement