CBSE | सीबीएसई बोर्डानंतर नंतर राज्य मंडळ अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेणार का?
लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत, त्यामुळे सीबीएसई (CBSE) बोर्डाने इयत्ता नववी ते इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य मंडळ अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक विचारत आहेत.
मुंबई : सीबीएसई बोर्डाने शाळा, कॉलेज बंद असताना इयत्ता नववी ते इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा ताण कमी होऊन एक दिलासा मिळालाय. मात्र, सीबीएसईच्या या निर्णयानंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग सुद्धा असा निर्णय घेणार का ? अभ्यासक्रम कमी करण्याची किती आवश्यकता आहे? याबाबत राज्य मंडळाच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी पालकांना अभ्यासक्रम शिकवताना काय अडचणी येतायेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
ज्या प्रकारे सीबीएसईने इयत्ता नववी ते बारावी या महत्त्वाच्या वर्षांचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी केल्यानंतर आता शालेय शिक्षण विभाग असा निर्णय राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांसाठी कधी घेणार? असा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक विचारताय. कारण राज्य मंडळाच्या दहावी, बारावीचा अभ्यासक्रम दरवर्षी एप्रिलपासून सुरू केला जातो आणि साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पूर्ण होतो. पण आता हा अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवत असल्याने काही बंधन येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे.
Corona Effect | सीबीएसईचा नववी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय
ज्याप्रकारे शिक्षकांना हा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार हे टेन्शन तर आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना दहावी, बारावीचा अभ्यास ऑनलाइन शिकताना येणाऱ्या अडचणी. एकीकडे शाळा बंद तर दुसरीकडे महत्वाचं वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करत रिव्हीजन कशी होणार? हा प्रश्न. त्यामुळे हा अभ्यासक्रम काही प्रमाणात जर कमी झाला तर आमचा ताण कमी होऊन आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल असा विद्यार्थ्यांचा म्हणणं आहे.
अभ्यासक्रम कमी करण्याची शिक्षण विभागाची तयारी याबाबत राज्याचे शालेय शिक्षण विभाग काम करत असून लवकरच याबाबत अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सीबीएसई प्रमाणे घेतला जाण्याची तयारी आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून दिलीये. त्यामुळे हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला तर सीबीएसई सोबत राज्य मंडळाच्या शाळात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना सुद्धा तितकाच दिलासा मिळेल.
ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा हट्ट शिक्षण विभागाने धरला असला तरी या ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार हा प्रश्न शिक्षकांसोबत विद्यार्थी पालकांना सुद्धा आहे. जर सीबीएसई प्रमाणे शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी होईल. त्यामुळे अपेक्षा आहे शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून सकरात्मक निर्णय लवकरच घेईल.
SSC Board सीबीएसई बोर्डाप्रमाणे अभ्यासक्रम 30% कमी करण्याचा विचार करणार का?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI