एक्स्प्लोर

Maharashtra Shivsena : निवडणूक आयोगासमोरील लढाईआधीच उद्धव यांना आणखी एक धक्का

Maharashtra Shivsena : निवडणूक आयोगातील लढाई सुरू होण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने धक्का दिला आहे.

Maharashtra Shivsena : शिवसेना आणि  निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol) कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर (Election Commission Of India) होणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरू होणाऱ्या संघर्षा आधीच उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला आहे. 

मंगळवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये जवळपास 8 राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना मागील काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. 

निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्हं धनुष्यबाण आपल्याला द्यावे अशी मागणीदेखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी न घेण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

दसरा मेळाव्यावर लक्ष

शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या दसरा मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेनेच्यावतीने शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यानंतर  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीदेखील मेळाव्यासाठी मैदानाची मागणी करणारा अर्ज महापालिकेला आहे. त्यानंतर महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची  मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेच्या मार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP MajhaLalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखलLalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
Embed widget