एक्स्प्लोर

Hingoli News : ... तर गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावावं : भास्कर जाधव

Hingoli News : गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावावं, असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Hingoli News : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडली आणि त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) असे दोन गट पडले. पुढे जाऊन ही लढाई पक्षाच्या वर्चस्वापर्यंत पोहोचली. पक्षातील गटनेतेपद, पक्षप्रमुख आणि त्यानंतर थेट पक्षचिन्ह. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. अशातच राज्यात मात्र प्रत्येक जिल्ह्यात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांत चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळतं. अशातच काल हिंगोलीमध्ये (Hingoli) शिवसेनेच्या वतीनं महामेळावा आयोजित केला होता. महामेळाव्यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हिंगोली (Hingoli News) शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याला भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि बबन थोरात (Baban Thorat) उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं (Balasaheb Thackeray) नाव लावावं, असं आव्हान भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांना दिलं आहे. 

गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावावं : भास्कर जाधव 

शिवसेनेची गद्दारी करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणाऱ्या गद्दारांनी त्यांच्या बापाच्या जागेवर बाळासाहेबांचं नाव वापरावं, असं आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. हिंगोली शहरांमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना भास्कर जाधव बोलत होते.  

बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आहेत. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली असता भाजपची काही चाणक्य मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत, असं वारंवार सांगत आहेत.  तुम्ही एवढेच प्रमाणिक आहात, तर बापाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावा. आम्हाला वाईट वाटणार नाही, आम्हालाही तुमची निष्ठा बघायची आहे. केवळ पाप लपवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जातो, असा घनाघातही भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला आहे.  

हिंगोलीचा सलमान खान शर्ट काढून दंड दाखवतो : शिवसेना जिल्हाप्रमुख भिसे 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या महामेळाव्या दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली. हिंगोलीचा सलमान खान शर्ट काढून दंड दाखवतो, असं म्हणत जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे. "कावड यात्रेमध्ये शर्ट काढून दंड दाखवायचे, गणपतीमध्ये कपडे काढून दंड दाखवायला लागले. इकडून केस, तिकडून केस, अरे काय ते आमदार संविधानिक पद आहे. राव त्याची काहीतरी किंमत तर असायला पाहिजे ना. व्यायाम शाळा सुद्धा सोडल्या नाही. यांनी  ज्या व्यायाम शाळेमध्ये आपण शरीर साधना करतो, आपलं शरीर बळकट करतो, त्या व्यायाम शाळेमध्ये हे मटका पत्ते खेळत आहेत."   

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget