एक्स्प्लोर
प्लास्टिकबंदी : मुंबईत 19 लाख 65 हजारांचा दंड वसूल
मुंबई महापालिकेने दहा दिवसात एक हजार 507 किलो प्लॅस्टिक जप्त केलं आहे.

मुंबई : राज्यात प्लॅस्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकेने एक हजार 507 किलो प्लॅस्टिक जप्त केलं आहे. या कालावधीत नागरिकांकडून 19 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बीएमसीने 23 जून रोजी प्लॅस्टिकच्या वापराविरोधात मोहीम सुरु केली. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यक्तींकडून दंडवसुलीचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. दंड भरण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्येक विभागात तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मुंबई महापालिकेने गेल्या दहा दिवसात एक हजार 507 किलो प्लॅस्टिक जप्त केलं आहे. तर प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून 19 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या प्लास्टिकवर बंदी - - चहा कप - सरबत ग्लास - थर्माकोल प्लेट - सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल - हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी) - उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक या प्लास्टिकवर कारवाई होणार नाही - - उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल - हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं - प्लास्टिक पेन - दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर) - रेनकोट - अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक - नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक - टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लास्टिक - बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणं
आणखी वाचा























