एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; राजकीय चर्चांना उधाण

CM Eknath Shinde : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरातील गणेशाचे दर्शन घेणार आहेत.

CM Eknath Shinde : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेट घेतली होती. त्यानंतर आज नारायण राणे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट घेणार आहेत. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही भेट होईल.

शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर आपली बाजू अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या जात आहेत.नारायण राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टरविरोधक समजले जातात. आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे-राणे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

शिंदेंच्या बंडाला राणेंचा पाठिंबा 

जून महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे समर्थन नारायण राणे यांनीदेखील केले होते. 'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता' असे ट्वीट राणे यांनी केले होते.  

तर, नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले होते. त्यावेळी त्यांनी मला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणता. मात्र, तुम्ही एका केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरून अटक केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. 

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राणेंची रसद?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे आक्रमकपणे व्यूहरचना आखत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवासाठी भाजपने कंबर कसली आहे. काही ठिकाणी भाजपकडून शिंदे गटाला ताकद पुरवण्यात येणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पराभव करण्यासाठी शिंदे-भाजप गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत राणे हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. राणे यांची कोकणी मतदारांवर असलेली पकड आणि कार्यकर्त्यांचे महत्त्वाच्या ठिकाणी असलेले जाळे याची मदत शिंदे गटाला होऊ शकते. शिंदे गटाची मुंबईत ताकद मर्यादित असल्याचे चित्र आहे. त्यातून राणे यांची शिंदे यांना मोठी मदत होऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget