(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai School : मार्चपासून मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळा पूर्वीप्रमाणे भरवण्याचा विचार
Mumbai School : मार्चपासून मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्वीच्या वेळेनुसार 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरवण्याचा विचार सुरू आहे. लवकरच या संदर्भातील परिपत्रक काढले जाणार आहे.
मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मुंबईत दररोज 100 ते 200 रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्चपासून मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्वीच्या वेळेनुसार 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरवण्याचा विचार सुरू आहे. लवकरच या संदर्भातील परिपत्रक काढले जाणार आहे. कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे शाळांचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
मुंबईत डिसेंबरपासून शाळा सुरू जरी झाल्या तर शिक्षण विभागाने ज्या प्रकारे नियमावली ठरवून दिली आहे त्यानुसार शाळा भरवल्या जात आहेत. शाळा या पूर्णवेळ सुरु नसून तीन ते चार तास शाळा 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू आहेत. मात्र मार्चपासून पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ शाळा त्यासोबतच 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती व इतर उपक्रम शाळांमध्ये सुरू करण्याचा विचार मुंबई महापालिका स्तरावर केला जात आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली आहे.
मुंबई कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे त्यामुळे निर्बंध सुद्धा शिथील करण्यात आले आहे. शाळा पूर्वीप्रमाणे भरण्याचा विचार केला जात आहे आणि कशा प्रकारचं परिपत्रक सुद्धा मुंबई महापालिकेकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे. शिवाय अतिरिक्त अभ्यासक्रम-उपक्रम हे शाळांमध्ये घेतले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काल 119 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 257 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 088 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 119 रुग्णांपैकी 21 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 249 बेड्सपैकी केवळ 739 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट
- महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोना; ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत पेच
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा