Mumbai : मुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर पहाटे अपघात, टेम्पो पलटी; चालकाचे नियंत्रण सुटले
Mumbai Accident News : मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Mumbai Accident News : मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून डिव्हायडर धडक मारून हा टेम्पो पलटी झाली आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे,
वाहतूक सुरळीत
या घटनेची माहिती मिळतच पोलिसांचे एक पथक घटनास्थळावर दाखल होऊन टेम्पो चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. महामार्गावरवर टेम्पो पलटी झाल्यामुळे वाहतूक पोलिसांना लवकरात लवकर हा टेम्पो बाजूला करावे लागणार आहे, अन्यथा सकाळची वेळ असल्याने पूर्वद्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता हा प्रश्न सुटला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
पुढील पाच दिवस अलर्ट
दरम्यान, मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील 5 दिवसासाठी अलर्ट देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना अतिवृष्टी तर काही जिल्हयांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कालची परिस्थिती पाहता, मुंबई कुलाबा येथे 84 मिमी तर सांताक्रूझ येथे 193.6 मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी सब वे टिळक नगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर तसेच शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचले होते. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत पालिकेच्या (BMC) नियंत्रण कक्षाने सांगितले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होत्या, तर पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत होता. मुंबई मध्ये NDRF च्या 3 टीम या आधीच तैनात आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून 2 अतिरिक्त टीम अशा एकूण 5 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या