एक्स्प्लोर

Coronavirus Vaccination : आवाज कुणाचा??? दुसऱ्या डोसचा!

Coronavirus Vaccination : 45 वर्षांवरील, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स या वर्गाकरिता लस पुरविण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली असून ज्यापद्धतीने त्यांच्याकडून लसीचा पुरवठा होईल त्यापद्धतीने लसीकरण केले जात आहे. दरम्यान, लसीकरिता अनाठायी धावपळ करण्यापेक्षा त्याच तारखेला लस घेण्याचा अट्टाहास न ठेवता, एक दोन आठवडे मागे पुढे झाले तरी काही फारसा फरक पडत नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

मुंबई : रेमेडेसीवर आणि ऑक्सिजन टंचाईच्या चर्चेतून कुठे बाहेर पडत नाही, तोच आता नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे, ती लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची. गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. हे  चित्र केवळ मुंबई पुरतेच मर्यादीत नसून राज्यातील सर्व भागात हीच परिस्थिती आहे. लसीकरण केंद्रावर लस आली तरी ती लवकर संपत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक ज्यांचा पहिला डोस मिळण्यात काही अडचण आली नाही मात्र त्यांना दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहे. 45 वर्षांवरील, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स या वर्गाकरिता लस पुरविण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली असून ज्यापद्धतीने त्यांच्याकडून लसीचा पुरवठा होईल त्यापद्धतीने लसीकरण केले जात आहे. दरम्यान, लसीकरिता अनाठायी धावपळ करण्यापेक्षा त्याच तारखेला लस घेण्याचा अट्टाहास न ठेवता, एक दोन आठवडे मागे पुढे झाले तरी काही फारसा फरक पडत नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

विशेष म्हणजे लसीकरणाच्या अनुषंगाने नागरिकांना देण्यात आलेल्या सूचना या दिवसागणिक बदलू शकतात. कारण जितका साठा येईल तोपर्यंत लसीकरण केंद्रावर लसी देणायचे काम सुरु असते. मात्र लस संपल्यानंतर कुणीच काही करू शकत नाही. नागरिकांनी राज्य शासनाची परिस्थितीत लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांचा हेतू जास्तीत जास्त लोकांना लस देणे हाच आहे.  

याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "लोकांनी विनाकारण धावपळ करू नये. कोविशील्डसाठी 6 आठवड्यापासून तीन महिन्यापर्यंत लस घेता येऊ शकते. तर कोवॅक्सीनसाठी 6 आठवडे थांबू शकता. कोवॅक्सीनसाठी दुसरा डोस हवा असेल तर ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकतात, मात्र कोविशील्डसाठी अगोदर वेळ घेऊन मगच लसीकरण केंद्रांवर गेले पाहिजे. नागरिकांनी सर्व गोष्टीची माहिती घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची ही वेळ आहे. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे म्हणून वेग वेगळे प्रयत्न महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना या लसीकरण मोहिमेत कोणताही त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहे, ड्राईव्ह व्हॅक्सिनेशन सुरु करण्यात आले आहे." 

त्या पुढे असेही म्हणाल्या की,"18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पाच केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यांना वेळ घेऊनच लसीकरण केंद्रावर यावे असे अपेक्षित आहे. लसीचा साठा वाढला की आपसूकच केंद्र आणखी वाढविण्यात येतील. लोकांनी सगळ्या परिस्थितीचा विचार करावा, आणि  घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे. अनाठायी धावपळ करून नका. प्रत्येक सूचना लसीकरणाच्या अनुषंगाने प्रसार माध्यमातून देण्यात येत आहे."     

राज्यात 16 जानेवारीला लसीकरण करण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आतपर्यंत 1 कोटी 73 लाख 21 हजार 029 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या गटातील 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 15 हजार 274 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

राज्याच्या आरोग्य विभागातर्फे 6 मे रोजी जी माहिती देण्यात आली त्यामध्ये, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : आयआयटींची क्षमता वाढवली, मोठी घोषणाUnion Budget 2025 : अर्थ बजेट:  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीताराण यांच्याकडून अर्थसंकल्प सादरीकरण सुरु,  विरोधकांचा सभात्याग, पहिल्या 15 मिनिटांत काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 01 February 2025Union Budget 2025 : अर्थ बजेट : अर्थसंकल्पावर तज्ज्ञांचं मतं काय? सर्वसामान्य, शेतकरी काय मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Budget 2025 Live Updates : बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
Pushpa 2 : रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
Embed widget