Mumbai Corona Update : मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक, गुरुवारी 1 हजार 384 नवे कोरोनाबाधित तर, 5 हजार 686 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईत नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवस कमी होत असून आज कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 384 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काही प्रमाणात आणखी कमी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला 18 हजार 40 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 581 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
14 जानेवारी | 11, 317 |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
18 जानेवारी | 6, 149 |
19 जानेवारी | 6, 032 |
20 जानेवारी | 5,708 |
21 जानेवारी | 5,008 |
22 जानेवारी | 3,568 |
23 जानेवारी | 2250 |
24 जानेवारी | 1857 |
25 जानेवारी | 1815 |
26 जानेवारी | 1858 |
27 जानेवारी | 1384 |
सध्या मुंबईतील 28 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 384 रुग्णांपैकी 184 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 827 बेड्सपैकी केवळ 2 हजार 927 बेड वापरात आहेत.
इतर बातम्या :
- Coronavirus Mask Free : राज्य होणार 'मास्कमुक्त? टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार
- सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी
- Covid 19 Cases in India : भारत कोरोनामुक्त कधी होणार? तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha