Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत किंचित घट; मागील 24 तासांत 1745 नवे कोरोनाबाधित
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांपासून कोरोनारुग्ण पुन्हा वाढू लागले असून शुक्रवारच्या तुलनेत आज काहीसे कमी रुग्ण आढळले असले तरी आकेडेवारी चिंताजनकच आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. बऱ्याच काळापासून आटोक्यात आलेल्या रुग्णसंख्येने आता पुन्हा वाढण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांसह प्रशसनाची चिंता वाढू लागली आहे. दरम्यान शुक्रवारच्या तुलनेत मागील 24 तासांत काही प्रमाणात कमी रुग्ण आढळले आहेत. बुधवारी 1956 नवे कोरोनाबाधित आढळल्यानंतर आज मात्र 1745 नवे बाधित समोर आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी एकंदरीत रुग्णसंख्या अधिकच असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 745 नवे कोरोनाबाधित आढळले असून 888 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दरही वाढत असल्याने चिंतेचं कारण आणखी वाढलं आहे. 561 दिवसांवर आता हा दर पोहोचला आहे.
राज्यात 2922 नवीन रुग्णांची नोंद
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात दोन हजार 922 नवे रुग्ण आढळले आहेत. तसंच मागील 24 तासांत एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1392 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,44,905 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.94% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86% एवढा आहे.
शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांच्या नुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस आणि बूस्टर डोस घेण्यासंदर्भात विभागाच्या स्तरावर कार्यवाही करावी असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
हे ही वाचा-