एक्स्प्लोर

Mumbai Air Quality : मुंबईतील हवा प्रदूषितच; दिल्ली, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सारखाच

Mumbai Pollution : मुंबईतील (Mumbai News) हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळं अनेकांना आरोग्याच्या (Health Issue) समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. 

Mumbai Air Quality Index : दिवसेंदिवस मुंबईतील (Mumbai News) हवेची गुणवत्ता (Mumbai Air Quality Index) खालवत चालली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 वर गेला आहे. त्यामुळं अनेकांना आरोग्याच्या समस्यांना (Health Problems) तोंड द्यावं लागत आहेत. हवेची पातळी घसरल्यामुळं मुंबईत (Mumbai) अनेक रुग्णांमध्ये सर्दी (Cold), खोकला (Cough), घसा खवखवणे (Sore throat) या सारख्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. 

Delhi Air Quality Index : मुंबई आणि दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सारखीच  

मागील काही दिवसांच्या तुलनेत मुंबईतील हवा गुणवत्तेतील परिस्थितीत (Air Quality Index in Mumbai) सुधार, अतिधोकादायक श्रेणीतून धोकादायक श्रेणीत जात आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र माझगाव, चेंबूर आणि बीकेसीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या आसपास आहे. माझगावातील एक्यूआय (Air Quality Index) 313 वर, चेंबुरमध्ये 319 तर बीकेसीतील एक्यूआय 300 च्या वर आहे. दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्यानं अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 245 असून, तो धोकादायक श्रेणीत आहे. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (Delhi Air Quality Index) देखील 245 वर आहे. मुंबईची दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेशी बरोबरी 

Air Quality Index : मुंबई उपनगरात हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा

मुंबई उपनगरातील इतर ठिकाणांवरील हवा गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. यामध्ये नवी मुंबईत हवेची गुणवत्ता 242 वर, अंधेरी 266, बोरीवली 132, वरळी 114, मालाड 232, कुलाबा 280, भांडूप 169 वर गेली आहे. 

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) किती असावा?

शून्य ते 50 एक्यूआय : उत्तम 
50 ते 100 एक्यूआय : समाधानकारक 
101 ते 200 एक्यूआय : मध्यम 
201 ते 300 एक्यूआय : खराब 
301 ते 400 एक्यूआय : अतिशय खराब 
401 ते 500 एक्यूआय : गंभीर 

हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र  गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. हवेतील धूलिकणांची वाढती पातळी ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरुन श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Mumbai Air Quality : मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, सलग सहाव्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget