Mumbai : चीनमध्ये कोरोनाचा वाढता वेग, महापालिका सतर्क, कोविड सेंटर 'स्टँडबाय मोड' वर
चीनमध्ये ज्या प्रकारे कोरोनाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. तसेच आयआयटी कानपूरच्या कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आता सतर्क झाली आहे.
Mumbai : मुंबईतील कोरोनाची (Coronavirus) घटती प्रकरणे पाहता, शहरात बांधलेल्या एकूण 9 जम्बो कोविड केंद्रांपैकी (Covid Centers) 6 बंद करण्याचा विचार महापालिका करत असल्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु चीनमध्ये ज्या प्रकारे कोरोनाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. तसेच आयआयटी कानपूरच्या कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आता सतर्क झाली आहे.
टास्क फोर्स विचार करून घेईल निर्णय
मुंबई महापालिकेचं म्हणणे आहे की, शहरात बांधलेले एकही कोविड केंद्र अद्याप बंद झालेले नाही. टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी सतत चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत जम्बो कोविड सेंटर बंद करायचे की ते चालू ठेवायचे, यावर टास्क फोर्स विचार करेल आणि त्याचा निर्णय होईल
9 पैकी 6 जंबो कोविड सेंटर्स ‘स्टँडबाय मोड’वर
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जम्बो कोविड सेंटर्स बंद झाल्याची चर्चा फेटाळून लावली आणि सांगितले की, मुंबईतील कोरोनाविरुद्धच्या लढाईत जंबो कोविड सेंटरचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबईत कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत, पण आम्ही चौथ्या लाटेची भीती नाकारत नाही. म्हणून आम्ही सध्या 9 पैकी 3 कोविड केंद्र चालू ठेवले आहेत. उर्वरित 6 जम्बो सेंटर्स ‘स्टँडबाय मोड’वर ठेवण्यात आली आहेत. स्टँडबाय मोड बंद करणे चुकीचे ठरेल.
स्वेच्छेने मास्क घालण्याचे आवाहन
नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील आपल्या परिसरात मास्कशिवाय फिरण्यास परवानगी दिली आहे. सध्या मुंबईत मास्कशिवाय फिरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लोकांना स्वेच्छेने मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. कारण कोविड-19 महामारी अद्याप संपलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Coronavirus Cases Today : दिलासादायक! देशात कोरोनाचा आलेख घटताच, गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण