(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ghatkopar: केमिकलच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू
Ghatkopar: या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवा
Ghatkopar: घाटकोपरच्या एन.एस.एस रोडवर असलेल्या केमिकल कंपनीची टाकी साफ करण्यास गेलेल्या एका कामगाराचा गुदमरुन मृत्यू झालाय. तर, दोन कामगार अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आलीय. त्यांच्यावर राजावडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (10 जानेवारी, सोमवार) सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, रुबिन डिंगनकर (वय, 35), श्रावण सोनावणे (वय, 25) आणि रामनिगोर सरोज (वय, 35) हे तिघ जण एस्के डायस्टफस अँड ऑरगॅनिक केमिकल प्रा.ली कंपनीची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरले. मात्र, टाकीत केमिकलचा काही अंश राहिल्यानं त्यांचा श्वास गुदमरला. कंपनीमधील इतर कामगारांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलानं या कामगारांना बाहेर काढलं. तसेच त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, रामनिगोर सरोज यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर, रुबिन डिंगनकर आणि श्रावण सोनावणे अत्यवस्थ असल्याचं समजत आहे. या घटनेत दोष कुणाचा आहे? याबाबत सखोल चौकशी सूरु असून पुढील कारवाई घाटकोपर पोलीस करणार आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
कू-
सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू
सोलापूरातील अक्कलकोट रोडवर काही दिवसांपूर्वी ड्रेनेज लाइनचे काम करीत असताना चेंबरमध्ये गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. ड्रेनेजचे काम सुरू असताना एक मजूर चेंबरमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एकामागे एक असे एकूण सहा जण चेंबरमध्ये उतरले होते. मात्र, यापैकी चौघांचा गुदमरून मृत्यू झाला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha