एक्स्प्लोर

एक हजार द्या, लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! धारावीतील रॅकेट उघड

Coronavirus Vaccination fake certificate : लसीकरण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धारावीतून ही अटक झाली आहे.

Coronavirus fake vaccination certificate : कोरोनाच्या पहिला लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्राचे जाळे पोलिसांनी उद्धवस्त केले आहे. काही रुपयांमध्ये लोकांना दोन्ही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र या टोळीकडून दिले जात होते. इतकंच नव्हे तर या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी कोविन अॅप वरसुद्धा दिसत होती. या प्रकारामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरणाचे नवे प्ररूप उभे राहिले आहे. अवघ्या एक हजार रुपयांत लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट लसीकरण प्रमाणपत्र कसे दिले जायचे?

धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडून हे प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सेकारन फ्रान्सिस नाडर (वय ३६) हा सायबर कॅफे मालक अवघ्या एक हजार रुपयांमध्ये करोना लशीच्या मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पुरवत होता. पोलिसांनी एका ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले. नाडरने त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला धारावी पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आरोपीने यापूर्वी किमान चार जणांचे लसीकरण केल्याची माहिती हाती लागली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडे पाठवण्यात आलेल्या ग्राहकानेही लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन या संकेतस्थळावर दिसते आहे. अधिकृतरित्या लसीकरण केल्यावर दोन मात्रांमधील बॅच क्रमांक वेगवेगळा असतो. पण या प्रकरणात दोन्ही मात्रा एकाच बॅचमध्ये झाल्याचे दिसत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime News: नाशिकमध्ये प्रेयसी अन् मित्रांच्या जाचाला कंटाळून संपवलं जीवन; शेवटच्या चिठ्ठीत लिहली नावं, पोलिस ॲक्शन मोडमध्ये, तरूणीसह दोघांवर गुन्हा दाखल
नाशिकमध्ये प्रेयसी अन् मित्रांच्या जाचाला कंटाळून संपवलं जीवन; शेवटच्या चिठ्ठीत लिहली नावं, पोलिस ॲक्शन मोडमध्ये, तरूणीसह दोघांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Embed widget