एक्स्प्लोर

Maharashtra : राज्यात पुन्हा निर्बंध; तिसऱ्या लाटेबाबत मंत्री नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य

 Maharashtra Corona Omicron Third Wave : राज्यात कोरोना ओमायक्रॉनचे संकट वाढत चाललं आहे. यामुळं जानेवारीत तिसरी लाट येऊ शकते, असं मलिक यांनी म्हटलं आहे

Maharashtra Corona Omicron Third Wave : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

नवाब मलिक यांनी म्हटलं की, काल कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. कॅबिनेटमध्ये आराखडा देत असताना लक्षात आलं की कोरोना रुग्णांमध्ये रोज 18 टक्क्यांनी वाढ होत आहे.  ओमायक्रॉनचे संकट वाढत चाललं आहे. यामुळं जानेवारीत तिसरी लाट येऊ शकते, असं मलिक यांनी म्हटलं आहे.  हायकोर्टाने सांगितलं आहे की तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायली हवी. जर निवडणूका झाल्या नाहीत तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. पंजाबमध्ये अशी परिस्थिती होऊ शकते, असंही मलिक म्हणाले. 

दरम्यान मुस्लिम आरक्षणावर बोलताना नवाब मलिक यावेळी म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील पत्रकार होते. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते बॅरिस्टर आहेत. त्यांच्या अध्यक्षांनी मला सांगावं की आरक्षण 50 टक्क्यांच्या पुढे कसं द्यायचं. घटनेची दुरुस्ती होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

टास्क फोर्सच्या कालच्या बैठकीत काय झालं

राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार

5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत 

आज दुपारपर्यंत राज्यशासन नवी नियमावली जाहिर करणार, असे असू शकतात नियम

लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध
100 जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा 200होती

बंदीस्त जागेतील कार्यक्रम 
समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांकरता 100 लोकांनाच परवानगी
25 % किंवा 100 यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू

खुल्या जागेतील कार्यक्रम
50% किंवा 100 यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू 100 लोकांनाच परवानगी

रेस्टरंट- 
50% क्षमतेने सुरु राहणार, 
प्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी
फटाके फोडता येणार नाहीत, आतिषबाजी नाही

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातम्या :

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश

ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी 

Omicron : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ, 23 नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget