ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
New Delhi Covid Omicron guidelines : मुंबईनंतर आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत..
New Delhi Covid Omicron guidelines : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत चालल्यानं केंद्रासह राज्य सरकारंही पावलं उचलताना दिसत आहे. मुंबईनंतर आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काल जारी केला आहे.
दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे. यात आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.
दिल्लीमध्ये काय असणार निर्बंध
ख्रिसमस सणानिमित्त प्रमाणात सेलिब्रेशन होतं. त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह असतो. 31 डिसेंबरच्या रात्री इंडियागेटसह दिल्लीतील अनेक ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. या सर्व बाबी लक्षात घेत संसर्गाचा फैलाव रोखण्यासठी दिल्ली सरकारने पावलं उचलली आहेत. डीडीएमएच्या आदेशानुसार दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
नाताळ आणि नववर्षानिमित्त कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन, गर्दी होईल असा कार्यक्रम आयोजित करण्यास पूर्णपणे मनाई राहणार आहे. यावर जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तांनी लक्ष ठेवायचे आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय दुकाने व आस्थापनांनांही सूचना देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी 'नो मास्क, नो एंट्री' हा नियम बंधनकारक करण्यात यावा, असे डीडीएमएने आदेश दिले आहेत.
मुंबईतही नवीन वर्ष आणि नाताळाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध
मुंबईत गर्दीच्या पार्श्वभूमी प्रशासनाकडून मुंबईत विशेष दक्षता बाळगली जाणार आहे. तुम्ही मोकळ्या जागी पार्टी करणार असाल तर 25 टक्के पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. जर तुम्ही घरातच मित्रमंडळींना बोलवून 31 डिसेंबर सिलिब्रेशन करणार असाल तर घराच्या एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के क्षमतेने पाहुण्यांना तुम्हाला बोलायचं आहे. मुंबई महानगर पालिकेकडून सिलिब्रेशनबाबत आखून दिलेल्या आणि पाहुण्यांना पार्टीला बोलावण्यासंदर्भात नियम ठरवले आहेत. गर्दी टाळा, कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळा, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल असं बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे.
बीएमसीकडून कोणत्या सूचना आणि नियम सांगण्यात आलेत?
1) लग्न व इतर समारंभांमध्ये उपस्थितीची मर्यादा काटेकोरपणे पाळावी.
2) बंदिस्त जागेत क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थिती.
3) खुल्या जागेत क्षमतेच्या 25 टक्केच उपस्थितीला परवानगी, मात्र एक हजारांपेक्षा अधिक उपस्थिती नियोजित असेल तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक आहे.
4) हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, मॉल्स आदी ठिकाणी नियमांचे योग्य पालन करावे
5) नाताळ, नववर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळावे
6 )मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे
इतर महत्वाच्या बातम्या
नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी करताय?, BMC चे नियम एकदा वाचाच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha