एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nana Patole Update: विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच! महाविकास आघाडीत मतभेद नाहीत: नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष  हा काँग्रेस पक्षाचाच होणार, त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची मतं जाणून घेऊन पक्षश्रेष्ठींना कळवेल.

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत आहे त्याला आम्ही भिक घालत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आमदारांच्या कोविड चाचण्या झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात जी भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे त्यात चुकीचे काही नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष  हा काँग्रेस पक्षाचाच होणार, त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची मतं जाणून घेऊन पक्षश्रेष्ठींना कळवेल आणि अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल. आघाडीतील तिन्ही पक्षांचा आपापल्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे संख्याबळ कमी होईल म्हणून व्हिप काढला हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. व्हीप काढणे ही एक व्यवस्था आहे, त्यात वावगे काही नाही. 

Maharashtra Politics: शिवसेना आणि काँग्रेसकडून आमदारांना व्हीप, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय?

राज्याच्या कृषी कायद्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता राज्याचा कृषी कायदा घाईघाईने बनवला जाऊ नये. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन फुलप्रुफ कायदा व्हावा ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांना आमचा विरोध आहे. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू होणार नाहीत. राज्य सरकार आपला कायदा बनवेल. हा कायदा शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच बनवला जाईल त्यासाठीचा मसुदा जनतेसमोर ठेवून शेतकऱ्यांची व जनतेची मतं मागवली जातील आणि त्यातून कायदा बनवला जाईल.  

मराठा आरक्षण प्रश्नी पटोले म्हणाले की,मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारलाच आहे हे स्पष्ट झाले आहे. 102 व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार केंद्रातील मोदी सरकारने काढून घेतलेले आहेत. त्यामुळे राज्याला आरक्षण देण्याचा कोणताच अधिकार राहिलेला नसतानाही फडणवीस सरकारने आरक्षणचा कायदा केला तो सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा उघडा पडला असून त्यांच्याकडे आता सांगण्यासारखे काहीही नाही. आरक्षण संपुष्टात आणणे हा भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे. भाजपाने मराठा समाजाची तसेच विधानसभेचीही दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचे अधोरेखीत झाल्याने केंद्र सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा.

विरोधी पक्षांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठीच ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा करत आहे. त्यांच्या दहपशाहीला आम्ही भीत नाही. अमित शाह यांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढली आहे त्याची चौकशी ईडी का करत नाही. जो भाजपात प्रवेश करतो त्याचे सर्व पाप धुतले जातात आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझाTop 80 At 8AM 26 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या #ABPmajhaABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 26 November 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Embed widget