एक्स्प्लोर
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे 6 निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आजच्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची उपस्थिती चर्चेचा होती.
कारण दीपक सावंत यांनी कालच आपला राजीनामा शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला होता. तसंच आजच्या बैठकीला हजर राहण्यास सांगितलं होतं.
त्यानुसार आरोग्यमंत्री दीपक सावंत हे आजच्या बैठकीला उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाजगी भागिदारी तत्त्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार.
- एकात्मिक बाल विकासासाठी राज्यात 2018-19 पासून राष्ट्रीय पोषण मिशनची अंमलबजावणी करण्यास मान्यता. त्यासाठी येणाऱ्या राज्य हिश्श्यास मंजुरी.
- नागरी सुविधा देण्यासाठी राज्यातील कटक मंडळांना राज्य योजनेमधून निधी वितरित करण्याचा निर्णय.
- मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील विधी विद्यापीठांना प्रशासकीय व शैक्षणिक खर्चासाठी पुढील 5 वर्षांकरीता प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा ठोक निधी.
- अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील उपयोजनांना नवीन नावे देण्यासह योजनांमधील बाबींचे सुधारित दर लागू करण्यास मान्यता.
- शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सुलभ आणि नियमित गौण खनिजांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम-2013 मध्ये सुधारणा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement