एक्स्प्लोर

राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये राम कदम हे पहिलेच आहेत असं नाही. राम कदम यांच्यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी परिसीमा गाठली आहे.

मुंबई: सत्ताधारी भाजप नेत्यांचा वादग्रस्त विधानांची मालिका कायम आहे. सध्याचं ताजं उदाहरण म्हणजे घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांचं वक्तव्य. ‘मुलीचा विरोध असला तरी तिला पळवून आणून तुम्हाला देणार’ असं वक्तव्य आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात केलं. राम कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. मात्र वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये राम कदम हे पहिलेच आहेत असं नाही. राम कदम यांच्यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी परिसीमा गाठली आहे. भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं रावसाहेब दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वादग्रस्त वक्तव्याचे महामेरु म्हणावं लागेल. कारण रावसाहेब दानवे हे अनेकदा त्यांच्या वक्तव्याने वादात आले आहेत. राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात साले, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली होती. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता. याशिवाय दानवेंनी नोटाबंदीवेळीही वादग्रस्त वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केलं होतं. इतर पक्षातील आयात नेत्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. शिवाय कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. आमदार प्रशांत परिचारक गेल्या वर्षी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नींबाबत अपमानजनक वक्तव्य केलं.सीमेवरचा जवान वर्षभर घरी येत नाही, तरीही त्याला मुलगा होतो आणि तो पेढे वाटतो, असं आमदार परिचारक म्हणाले होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख आधी गुंडांना निवडून आणू आणि मग त्यांना सुधारु,  वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु, असं अजब वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं होतं.  गिरीष बापट 'तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता, त्या आम्ही पण रात्रीच्या पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी सप्टेंबर 2015 मध्ये पुण्यात केले होते. नवरा बायकोच्या भांडणापेक्षा ठेवलेलीचा जास्त त्रास होऊ लागला आहे. पण ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोची भांडणे वाढणारच, अशी वादग्रस्त टिप्पणी मंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवड शहरात केली होती. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आरक्षणमुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागत असल्याचं वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे. नाशिकमध्ये चित्पावन ब्राम्हण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.  याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं होतं. नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम अहमदनगरमध्ये उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी फेब्रुवारीत  2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते, तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचं काम करते' असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. 2016 मध्ये  रत्नागिरीच्या नाणिजच्या नरेंद्र महाराजांच्या 50 व्या वाढदिवस समारंभात ते बोलत होते. संबंधित बातम्या  आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली  भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय?   आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात : मुक्ता टिळक   आधी गुंडांना निवडून आणू, मग त्यांना सुधारु : सुभाष देशमुख   वर्षभरानंतर सरकार बदलणार, गिरीश बापटांचं खळबळजनक वक्तव्य   'होय, मी पण 'त्या' क्लिप रात्री बघतो', मंत्री गिरीष बापट यांची विद्यार्थ्यांसमोर कबुली   नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget