एक्स्प्लोर

CNG Rates : मुंबईकरांना मुसळधार पावसात महाईगाचा धक्का, सीएनजीसह पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

CNG Rate : मुसळधार पावसात मुंबईकरांना महागाईचा धक्का बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडनं दरवाढीसंदर्भात निर्णय घेतला आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत  अधिक असल्यानं कमी केला होता. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी थोडेसे कमी झाले होते. मुंबईकरांना हा दिलासा मिळत असतानाच सीएनजी (CNG Rates Hike) आणि पीएनजीच्या (PNG Rate) दराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसापाठोपाठ मुंबईकरांना वाढत्या महागाईचाही फटका बसणार आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) घेतला आहे. 

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळं मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. त्यानुसार सीएनजीच्या दरात किलोमागे दीड रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळं सीएनजीची किंमत ७५ रुपये प्रति किलोवर जाईल. तसंच घरगुती पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम एका रुपयानं वाढ होणार आहे. त्यामुळं घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम ४८ रुपयांवर जाईल.

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याचं कारण?

मुंबईकरांना आता महागाईचा सामना करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यामागं नेमकं कोणतं कारण आहे ते देखील सांगितलं आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं त्याच्या तुलनेत दरवाढ करण्यात आली आहे.  मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून लागू केले जातील, अशी माहिती देखील महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे.

मुंबईत सीएनजी, पीएनजीचे दर वाढले

मुंबईत सीएनजी १.५० रु. प्रति किलोनं महाग झाला आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. मुंबईतील अनेक रिक्षा आणि चार चाकी वाहनं सीएनजीवर चालवली जातात त्यामुळं सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं प्रवास महागणार का हे देखील पाहावं लागेल. 

राज्य सरकारनं नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात विक्रीकर कमी करत मुंबई करांना  डिझेल आणि पेट्रोलच्या दरात नाममात्र कपात करत दिलासा दिला होता. यानंतर काही दिवसातचं त्यांना सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या : 

Mumbai News : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे रुळांवर पाणी, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे झाडं पडली

मोठी बातमी : अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे नवी मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना
दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Embed widget