एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकास आघाडी सरकारचा आणखी धक्का, भाजप सरकारच्या काळातील कामांना स्थगितीचे आदेश
भाजप सरकारच्या काळात ही कामं मंजूर झाली होती. मात्र कामांचं वाटप करताना सरकारने पक्षपातीपणा केल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासकामांचा समावेश आहे. या कामांना दोन कोटींपासून 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळालं होतं.
भाजप सरकारच्या काळात ही कामं मंजूर झाली होती. मात्र कामांचं वाटप करताना सरकारने पक्षपातीपणा केल्याचा आरोप तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे. बहुतांश कामं ही भाजपच्या आमदारांना मिळाल्याचा दावा त्यांचा आहे. त्यामुळे कार्यारंभाला मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत.
कोणत्या कामांना स्थगिती?
- ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे
- कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामं
- ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामं
- यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम
- या अंतर्गत मंजूर झालेल्या 2019-20 सालातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश
- या योजनेअंतर्गत अजूनही कार्यआरंभ मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश
संबंधित बातम्या
आरे कारशेडनंतर ठाकरे सरकार बुलेट ट्रेन प्रकल्पही रोखणार?
आरे कारशेडला स्थगिती, मेट्रोला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement