एक्स्प्लोर

आरे कारशेडला स्थगिती, मेट्रोला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 

आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला आहे. मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडच्या कामाला अखेर नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.  जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. रातोरात झाडांची कत्तल कधीही मान्य नाही, असेही ते म्हणाले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूर्ण कामाची पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. आपले वैभव नष्ट करुन विकास आम्हाला नको आहे, असेही ते म्हणाले. आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला आहे. मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, माझ्या जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी माझे अधिकारी घेतील. जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, जनतेने दिलेल्या करातून विकास कामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. ‘सरकार माझे आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकास कामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, असे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Embed widget