Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates : महाविकास आघाडीच्या महामोर्चाची सांगता; महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Mahavikas Aghadi Morcha Live Updates : आज सकाळी साडेदहा वाजता महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Background
Maha vikas Aghadi Morcha Today Live Updates : मुंबईत आज महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
'या' मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रपेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
वाहतूक व्यवस्थेत बदल, 'या' मार्गांचा करा वापर
मुंबईत (Mumbai) आज महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा (Mahavikas Aaghadi Morcha) काढण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या मोर्चाची सुरुवात होणार असून बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ (Times Of India Building) मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत (Mumbai Traffic Updates) बदल करण्यात आले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.
'हा' मार्ग वाहतुकीसाठी बंद
- मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
- भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील मार्गाचा वापर करावा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड
- नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड
भाजपचे माफी मांगो आंदोलन
आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघत असताना दुसरीकडं भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातमुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून हे माफी मांगो आंदोलन केलं जाणार आहे.
Mahamorcha Live Updates : छत्रपती शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही : शरद पवार
LIVE UPDATES#BreakingNews : छत्रपती शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही : शरद पवार लाईव्ह...#UddhavThackeray #SharadPawar #MahaVikasAghadi #Mahamorcha #Mumbai #Maharashtra #Shivsena #AdityaThackeray #Congress #NCP #BJP https://t.co/AVmE2W0N1t pic.twitter.com/fO9ZbYgNT8
— ABP माझा (@abpmajhatv) December 17, 2022
Maha Vikas Aghadi Morcha Live Updates : कोश्यारींना राज्यपाल मानत नाही - उद्धव ठाकरें
कोश्यारींना राज्यपाल मानत नाही, महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा निशाणा























