एक्स्प्लोर

मातोश्रीवर वडे-खिचडी खाऊन दिलजमाई, रितेशच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची दिलखुलास उत्तरं

आम्ही आधीच ठरवलं, जो बित गया वो बित गया. आता नव्याने सुरुवात करुया. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याची सवय आहे. देशात असंगाशी संग सुरु आहे. एकमेकांचे चेहरेही न पाहणारे एकत्र हात उंचावत आहेत. आम्ही एकमेकांबरोबर नेहमीच होतो. चांगल्यातही आणि वाईटातही. काही मतभेद होते, पण व्यापक हितासाठी मतभेद दूर करुन महाराष्ट्र आणि देशासाठी एकत्र आलो म्हणून चेहऱ्यावर डबल हसू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

मुंबई : 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेता रितेश देशमुखने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. रितेशच्या प्रश्नांना फडणवीसांनी दिलखुलास उत्तरं दिली. रितेश : तुम्ही सत्तेत आल्यापासून 'सामना'तून बाण चालवण्यात येत आहेत. कधी त्यांनी स्वबळाची भाषा केली, कधी तुम्ही आपल्याला कोणाची गरज नसल्याचं म्हणालात. चार वर्ष हे सुरु होतं, मात्र निवडणूक जवळ येताच तुमचे हसरे चेहरे दिसले. तुम इतना जो मुसकुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो? फडणवीस : आम्ही आधीच ठरवलं, जो बित गया वो बित गया. आता नव्याने सुरुवात करुया. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याची सवय आहे. देशात असंगाशी संग सुरु आहे. एकमेकांचे चेहरेही न पाहणारे एकत्र हात उंचावत आहेत. आम्ही एकमेकांबरोबर नेहमीच होतो. चांगल्यातही आणि वाईटातही. काही मतभेद होते, पण व्यापक हितासाठी मतभेद दूर करुन महाराष्ट्र आणि देशासाठी एकत्र आलो म्हणून चेहऱ्यावर डबल हसू आहे. रितेश : दिलजमाई चित्रपटाच्या मेकिंग मागील स्टोरी काय? दिग्दर्शक-पटकथा लेखक कोण? फडणवीस : ही दिलजमाई मातोश्रीवर गेल्यानंतर झाली. रश्मी वहिनींनी वडे, साबुदाणा खिचडी असे वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही. रितेश : 2014 मध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 63. हे गणित असताना शिवसेनेला 144 जागा आणि भाजपलाही तितक्याच. अशामुळे भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेला अॅडव्हांटेज मिळाल्याचं वाटत आहे. फडणवीस : राजकीय वास्तविकता असते, युती करताना ते दोन पावलं मागे गेले आहेत, आम्ही दोन पावलं मागे गेलो, ते पुढे आले, तर आम्हीही पुढे आलो. प्राप्त परिस्थितीत राज्यासाठी जे चांगलं आहे, ते आम्ही करु, कार्यकर्ते समजून घेतील. आम्ही एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची आंतरिक इच्छा होती. त्यामुळे तेही खुश आहेत. रितेश : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे, चुकून युती आलीच तर उपमुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री कोण? फडणवीस : चुकून का? युतीच येणार. सब चीजे यहा नही बताई जाती. मुख्यमंत्रिपद कोणाला, उपमुख्यमंत्रिपद कोणाला, हे सगळं ठरलं आहे, योग्य वेळी सस्पेन्स उलगडणार रितेश : आमच्या सिनेमाला थिएटरमध्ये रिकाम्या खुर्च्या दिसल्या, की वाईट वाटतं. पुण्यात आपल्या सभेत रिकाम्या खुर्च्या होत्या, आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? ज्या भाजप कार्यकर्त्यांनी सभा आयोजित केली होती, ते सध्या पक्षातच आहेत का? फडणवीस : ते भाजपमध्येच आहेत. सुरुवातीला, लोक येत आहेत, असं आयोजक म्हणत होते. शाळेत बसलो. चहा प्यायलो. पण लोकच येईना. उमेदवारही आले नाहीत. शेवटी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले, आमच्याकडे सभा आहे? आम्हाला तर माहितीच नाही. शेवटी बापट साहेब (गिरीश बापट) आले. त्यांना सांगितलं तुम्हीच भाषण करा. त्यांनी सभेला संबोधित केलं, मी पुढच्या सभेला निघून गेलो. त्या सभेला माणसं नसली, तरी चारही प्रभागात उमेदवार आमचेच निवडून आले. रितेश : राजकारणात अभिनयाचे गुण किती आवश्यक असतात? फडणवीस : अभिनय येणं हा अतिरिक्त फायदा आहे. पण राजकारणात केवळ अभिनय करुन लोकांना नेहमी फसवता येत नाही. लोकांशी संवाद साधता येणारं काहीतरी असावं लागतं. कोणाचे हावभाव चांगले असतात, तर कोणाची शब्दफेक. त्यामुळे लोकांची नाळ लगेच जुळते. जे लोकांमध्ये जाऊन काम करतात, त्यांना लोक डोक्यावर घेतात. राजकीय क्षेत्रात अभिनय येणं, हे आवश्यक नाही, पण आला तर उत्तम. रितेश : मुख्यमंत्री म्हणून अभिनयाची सर्वाधिक गरज कधी भासते? फडणवीस : मला सहसा राग येत नाही. मात्र काही परिस्थितीमध्ये आपण आक्रोशित आहोत, आपल्याला राग आला आहे, असं दाखवावं लागतं. अशावेळी मी अभिनय करुन रागावलो असल्याचं दाखवतो. रितेश : अनेक मंत्रिमंडळात येऊ इच्छिणारे भेटतात, तेव्हा अभिनय कसा असतो? फडणवीस : मला एका पत्रकाराने याची गुरुकिल्ली सांगितली. स्वर्गीय विलासराव देशमुख सांगायचे, अधिवेशन झालं की मग विस्तार आहे. त्यानंतर सांगायचे पुढच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार आहे. यावर त्यांनी इतकी वर्ष काढली. मी तेच केलं. राजकारणात आशा कोणीच सोडत नाही, त्यामुळे गेली साडेचार वर्ष माझं यावर भागलं. रितेश : मराठी माणसामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असं तुम्ही म्हणाला होतात.  महाराष्ट्रातून पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायला आवडेल? शरद पवार की नितीन गडकरी? फडणवीस : 2019 आणि 2024 तर बुक आहे. महाराष्ट्रातून पंतप्रधान तर झालाच पाहिजे, पण नेमकं कोण, यावर 2025 मध्ये चर्चा करु रितेश : विदर्भ वेगळा झालाच, तर विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल की महाराष्ट्राचा? फडणवीस : खरं तर हेडलाईनसाठी अनेक गोष्टी देऊ शकतो. पण विकास झाला पाहिजे, ही विदर्भाच्या प्रत्येक माणसाची भावना आहे. अन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी आहे. मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मी मराठवाडा आणि विदर्भाला त्यांच्या वाट्याच्या गोष्टी दिल्या. पण एक नागपूरकर महाराष्ट्राचा विचार करतो, याचा मला अभिमान आहे. तरी टॉप प्रायोरिटी मराठवाडा आणि विदर्भाला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. उद्धव ठाकरे यांना पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक रोहित शेट्टी या बॉलिवूडमधील कलाकारांनाही गौरवण्यात आलं. रितेश देशमुखला महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. क्रिकेटपटू स्मृती मानधना, अभिनेत्री गौरी इंगवले, अभिनेत्री कल्याणी मुळे, रंगभूषाकार विक्रम गायकवाड, चेतना सिन्हा, उद्योजक विशाल अग्रवाल यांनाही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आलं. दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांना 'रंगभूमीवर सम्राट' म्हणून गौरवण्यात आलं, तर आणि... डॉ. काशीनाथ घाणेकर सिनेमासाठी अभिनेता सुबोध भावेचा सन्मान करण्यात आला.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्र जन्मभूमी, विकी कौशलची मराठीतून भाषणाला सुरुवात, पुलवामा हल्ला वैयक्तिक हानी
उद्धव ठाकरेंनी विचारलं 'हाऊज् द जोश', मुख्यमंत्री म्हणतात 'हाय सर!'
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget