Mumbai Traffic Police : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी आता लोकअदालतचा पर्याय
मुंबई वाहतूक पोलीस थकीत ई-चालान रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ई-चालान रक्कम गोळा करण्यात अनेक समस्या आहेत, ज्याचे निराकरण लोकअदालतद्वारे करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस थकीत ई-चालान रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ई-चालान रक्कम गोळा करण्यात अनेक समस्या आहेत, ज्याचे निराकरण लोकअदालतद्वारे करण्यात येणार आहे. ही लोकअदालत तीन दिवस चालणार आहे, ज्याद्वारे किमान 2 लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढली जातील. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून सुमारे 432 कोटी रुपयांचा दंड वसूल करणे बाकी आहे.
जे लोक वाहतुकीचे नियम मोडतात त्यांना ई-चालानद्वारे दंड केला जातो, पण लोक दंड भरत नाहीत. दंडाची रक्कम गोळा करण्यासाठी, वाहतूक पोलिस कॉल सेंटरवरून फोन करतात आणि लोकांना दंड भरण्यास सांगतात, मग वाहतूक हवालदार 50 टीम बनवतात आणि लोकांच्या घरी जाऊन दंडाची रक्कम गोळा करत आहे. वाहतूक पोलीस दंडाची रक्कम कॉल सेंटरद्वारे गोळा करत आहेत, घरी जात आहेत परंतु दंड गोळा करण्यात काही अडचणी येत आहेत. त्यामुळं हा प्रश्न लोकअदालत द्वारे निकाली काढली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांनुसार,जेव्हा वाहतूक पोलिस ई-चालानची थकबाकी वसूल करण्यासाठी जातात किंवा त्यांना कॉलद्वारे पैसे भरण्यास सांगतात. तेव्हा काही लोक पैसे देणे टाळतात. लोकं वाहतूक पोलिसांना सांगतात की त्यांना पाठवले गेलेले ई- चालान हे चुकीचे आहे. जेव्हा वाहतूक पोलिसांना ई चालान द्वारे आकारलेला दंड वसूल करायचा असतो तेव्हा ते करू शकत नाही कारण लोकं तेव्हा टाळतात करतात. काही लोक तक्रार करतात की त्यांना दिवसातून दोन वेळा नो पार्किंगसाठी दंड आकारण्यात आला आहे.
काही लोक म्हणतात की जेव्हा ई-चालान केले गेले, तेव्हा वाहनाचा मालक दुसरा कोणी होता, तर काही लोकांनी सांगितले की वाहन त्यांच्या ड्रायव्हर चालवत होता आणि तो आता नोकरी सोडून गेला आहे. अशा प्रकारची कारणं लोकांकडून देण्यात येत आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांना आकारलेला दंड वसूल करण्यास अडचणी समोर येत आहेत आणि म्हणून हे सर्व प्रश्न लोकअदालतीद्वारे निकाली काढले जातील.
ही लोकअदालत 25 सप्टेंबर रोजी होणार असून ती तीन दिवस चालणार आहे. या लोकअदालतीची सुनावणी जेएमएफसी न्यायाधीश करणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या लोकअदालतीच्या सुनावणीमध्ये एकूण 16 जेएमएफसी न्यायाधीश असतील.
वर्ष 2016 ते 31 जुलै 2021 पर्यंत एकूण 20996200 ई-चलनद्वारे दंड ठोठावण्यात आले आहेत, ज्यांची एकूण रक्कम 680 कोटींपेक्षा अधिक रुपये आहे, त्यापैकी 248 कोटींपेक्षा 31 जुलैपर्यंत प्राप्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांना अद्याप वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 432 कोटी वसूल करणे बाकी आहे.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्यांच्या विरुद्ध वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकरण अधिक आहेत, परंतु दंड भरला जात नाहीत, अशा लोकांना लोकअदालतमध्ये बोलावले जाईल. त्या लोकांची यादी तयार केली जात आहे. जे लोक ई-चालानची रक्कम भरत नाहीत त्यांना लोकअदालतमध्ये बोलावले जाईल आणि त्यांचे प्रश्न निकाली काढले जातील. ही लोक अदालत 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे, ज्यात सुमारे दोन लाख लोकांना बोलावून ऐकले जाईल.