एक्स्प्लोर
Mega Block : आज घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करा, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
Local Train Mega Block : रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करणं गरजेचं आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Mega Block, 15 October : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी लोकलच्या प्रवासाचं (Mumbai Local Train) नियोजन करा. आज मध्य रेल्वेकडून (Central Railway) तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी (Repair and Track Maintenance) मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local Railway) मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा. मध्य रेल्वेकडून रविवार, 15 ऑक्टोबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) घेण्यात येणार आहे. मुंबईच्या उपनगरीय विभागांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मध्यरात्री 1 ते 4 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला. रविवारी मेगाब्लॉकमुळे अप आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांही वळवण्यात आल्या आहेत. त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
- कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील यामुळे रेल्वे गाड्या गंतव्यस्थानावर 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
- चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत*
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 04.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल.
- गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
- ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 8 दरम्यान विशेष रेल्वे चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement