एक्स्प्लोर
अलिबागच्या व्यक्तीसाठी इंदूरहून हृदय, ग्रीन कॉरिडॉरला यश
मुंबई : अलिबागमध्ये राहणाऱ्या एका 46 वर्षीय व्यक्तीसाठी गेले दोन महिने अत्यंत खडतर होते. मात्र मंगळवारी इंदूरच्या एका ब्रेन डेड व्यक्तीचं हृदय दान करण्यात आलं आणि हृदयाचा दोन तासांचा प्रवास झाल्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. 'डीएनए' वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या चोईटाराम रुग्णालयातून मुंबईत या गरजू रुग्णासाठी हृदय पाठवण्यात आलं. अलिबागला राहणारी संबंधित व्यक्ती मुंबईच्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल होती. ग्रीन कॉरिडॉर केल्यामुळे अवघ्या दोन तासात इंदूर ते मुंबई प्रवास पार पडला. मध्य प्रदेश आणि मुंबईत हृदयाची देवाण घेवाण होण्याची ही गेल्या वर्षभरातली तिसरी घटना आहे.
इंदूरमध्ये रस्ते अपघातात बळी पडलेल्या एका 45 वर्षीय पुरुषाला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्याचं हृदय 566 किलोमीटरचा प्रवास करुन अवघ्या दोन तासात मुंबईला आणण्यात आलं. मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने दुपारी 12.59 विमानतळावरुन निघालेली अॅम्ब्युलन्स 18 मिनिटांत 19 किलोमीटरचा प्रवास करु शकली. वाकोला, कुर्ला, चेंबुर, विक्रोळी, मुलुंडच्या वाहतूक विभागाने ग्रीन कॉरिडॉरसाठी मदत केली.
हृदयाशिवाय इंदूरच्या रुग्णाचे लिव्हर दिल्लीला, दोन किडनी आणि नेत्र (कॉर्निया) इंदूरमधील दुसऱ्या एका रुग्णालयाला तर त्वचा स्कीन बँकेत पाठवण्यात आली. 'मरावे परि अवयवरुपी उरावे' या वैद्यकशास्त्रातील आधुनिक म्हणीचा प्रत्यय दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement