विद्यार्थ्यांना दिलासा! समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचा शुभारंभ
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हस्ते शुभारंभ झाला.
![विद्यार्थ्यांना दिलासा! समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचा शुभारंभ Launch of distribution of free textbooks by Samagra Shiksha Abhiyan विद्यार्थ्यांना दिलासा! समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचा शुभारंभ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/19040258/varsha-gaikwad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. 1 ली ते इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत 5 कोटी 73 लाख 30 हजार 269 पाठ्यपुस्तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत 3 कोटी 87 लाख 5 हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास आज शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार आहे.
रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही : उद्धव ठाकरे
पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संवाद साधून समग्र शिक्षा अंतर्गत व विक्री करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा आढावा घेतला व त्यासंदर्भांत सर्व अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदशन केले. यावेळी पाठयपुस्तक मंडळाचे संचालक विवेक गोसावी, गोरेगाव विभागीय भांडार व्यवस्थापक अजय यादव व भांडारातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पिडीएफ पुस्तकांना भरघोस प्रतिसाद; सुमारे 81 लाख पिडीएफ झाल्या डाऊनलोड खासगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता ही पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वीच्या सर्व पाठ्यपुस्तकांची PDF File मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत इयत्ता 12 वीच्या 20 लाख 54 हजार 194 व इयत्ता 1 ली ते 11 वी च्या 61लाख 20हजार 753 PDF File डाऊनलोड केलेल्या आहेत. असे असुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने आजपासून दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्री सुरू करण्यात आली आहे.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)