एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबईतील जमीन फ्री होल्ड, सिडकोपासून मुक्ती
नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्व जमीन फ्री होल्ड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे इमारतीचा पुर्नविकास करताना किंवा रुम विकत घेताना यापुढे सिडकोच्या परवानगीची गरज लागणार नाही.
सिडको एमडी, कोकण आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जमिन फ्री होल्ड करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे एमडी भूषण गगराणी उपस्थित होते.
नवी मुंबईची 344 चौरस किलोमीटरची जमिन आता फ्री होल्ड होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील 5 लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. सिडकोच्या घरांसोबत खाजगी घरांना ही दिलासा मिळणार आहे.
40 वर्षानंतर नवी मुंबईकरांना सरकारनं भेट दिली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नवी मुंबईकरांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.
काय आहे प्रकरण?
नवी मुंबई शहराचा विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत होता. त्यासाठी नवी मुंबईतील जमीन सिडकोला 60 वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात आली होती.
नवी मुंबईत नवीन बांधकाम करण्यासाठी किंवा रुम विकत घेण्यासाठी सिडकोची परवानगी आवश्यक होती.
सिडकोच्या ताब्यातील सर्व जमीन फ्री होल्ड करण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता.
नवीन घर विकत घेताना ट्रान्सफर चार्जेस द्यावे लागत होते. ते आता माफ होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement