एक्स्प्लोर
Advertisement
रांगेत उभं राहून लालबागच्या राजाला फसवलं, दान पेटीत हजाराच्या जुन्या नोटा!
लोकांनी थेट रांगेत उभं राहून लालबागच्या राजाला फसवल्याचं उघड झालं आहे. कारण लालबागच्या राजा गणपतीच्या दानपेटीत, रद्द झालेल्या हजाराच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत.
मुंबई : नोटाबंदी होऊन येत्या नोव्हेंबरमध्ये वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही लोकांकडे पाचशे-हजाराच्या नोटा असल्याचं उघड झालं आहे.
या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा खपवण्यासाठी लोक काय-काय आयडिया करतील याचा अंदाज बांधू शकणार नाहीत, अशी घटना समोर आली आहे.
लोकांनी थेट रांगेत उभं राहून लालबागच्या राजाला फसवल्याचं उघड झालं आहे. कारण लालबागच्या राजा गणपतीच्या दानपेटीत, रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा सापडल्या आहेत.
या नोटांचं मूल्य थोडं थोडकं नाही तर तब्बल 1 लाख 10 हजार रुपये आहे. म्हणजेच या 110 नोटा आहेत.
दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड
25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा कमी दान
यंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती.
यावर्षी 29 ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.
सोन्या-नाण्याचा आज लिलाव
रोख पैशांशिवाय लालबागच्या राजाना अनेक सोन्या-नाण्याचं दानही अर्पण करण्यात आलं आहे. या सोन्याचा आज लिलाव होणार आहे.
5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदी
लालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement