एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja 2023 : आधी बाचाबाची, मग थेट हाणामारीच; लालबागच्या राजाच्या चरणाजवळच फ्री स्टाईल जुंपली

Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं दुर्भाग्यपूर्ण चित्र पाहायला मिळालं.

Lalbaugcha Raja 2023 : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2023) चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून भाविकांनी लालबागमध्ये गर्दी केली आहे. अशातच लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना झाल्यापासूनच तेथील गर्दीचे, कार्यकर्ते आणि भाविकांमधील राड्याचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा आणखी काही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये लालबागच्या राजाच्या चरणाशीच भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाईल जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. 

लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं दुर्भाग्यपूर्ण चित्र पाहायला मिळालं. मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडल्याचं पाहायला मिळालं. अशातच दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सध्या केला जात आहे. 

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती आणि संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी देशासह राज्यभरातून भाविक येत असतात. मंडळाच्या मंडपात अभूतपूर्व गर्दी होतेय. गणरायाच्या मंडपात सुरक्षेसाठी पोलीस आणि कार्यकर्ते तैनात असतात. पण गर्दीचा रेटा प्रचंड असल्यामुळे गर्दी नियंत्रित करणं केवळ अशक्य असतं. 


Lalbaugcha Raja 2023 : आधी बाचाबाची, मग थेट हाणामारीच; लालबागच्या राजाच्या चरणाजवळच फ्री स्टाईल जुंपली

काही वेळापूर्वीच हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे. लालबागच्या राजाच्या मंडळात असे प्रकार दरवर्षी घडत असल्याचं आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतं. कधी पदाधिकारी आणि पोलिसांमधील हाणामारी, तर कधी पोलिसांकडून पत्रकारांवर करण्यात आलेली अरेवारी, तर कधी भाविकांना झालेली धक्काबुक्की... यांसारखे प्रकार अनेकदा घडतात आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


Lalbaugcha Raja 2023 : आधी बाचाबाची, मग थेट हाणामारीच; लालबागच्या राजाच्या चरणाजवळच फ्री स्टाईल जुंपली

लालबाग राजाच्या मंडळाविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबईतील (Mumbai News) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडपात मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप होत आहे. खरंतर, लालबागच्या राजा मंडळात भाविकांची रांग प्रचंड मोठी असते. कित्येक तास या रांगेत उभं राहावं लागतं. अशातच काही वेळा गाभाऱ्यात प्रवेश करताना धक्काबुक्की होते. 

लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यावतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंडळाचे सदस्य आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये दररोज बाचाबाची होत असल्याची ही तक्रार असून,  व्हीव्हीआयपींना दर्शन देताना विशेष व्यवस्था पुरवली जाते, मात्र वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : Lalbaugcha Raja Fight : सुरक्षारक्षकानं धक्का दिला, भाविकानं थेट कानाखाली मारली ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget