एक्स्प्लोर

Lalbaug Bus Accident: मद्यधुंद प्रवाशानं बेस्टच्या ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं, अन्...; लालबागमधील भीषण अपघातात 9 प्रवासी गंभीर

Lalbaug Bus Accident News : एका मद्यधुंद चालकानं गोंधळ घातल्यामुळे लालबागमध्ये भीषण अपघात होऊन नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Lalbaug Bus Accident : एका धक्कादायक घटनेनं मुंबई (Mumbai Crime) हादरली आहे. मुंबईतील (Mumbai News) गजबजलेल्या लालबाग (Lalbaug News) परिसरात बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात (Accident News) 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्टची 66 क्रमांकाची (BEST Bus 66 No) बस लालबागमध्ये गेल्यानंतर बसमधून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टेअरिंग हिसकावून घेतलं, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) वाहतूक शाखा आहे. मद्यधुंद प्रवाशानं केलेल्या कृत्यामुळे बस चालकाचं वाहनावरील ताबा सुटल्याने शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींची धडक बसली. काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली. 

मद्यधुंद प्रवाशानं चालकाकडून स्टेअरिंग हिसकावलं, अन्... 

बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, 66 क्र क्रमांकाची (Electra ) बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेनं जात असताना गणेश टॉकीजच्या दरम्यान एका दारुड्या प्रवाशानं चालकाबरोबर झटापट केली. त्यानंतर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेनं गेली. या दरम्यान, फुटपाथवरुन जाणारे काही पादचारी जखमी झाल्याचं समजलं आहे. पोलिसांनी बसमधील दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. त्यासोबतच, वाहक आणि चालक यांना काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. आतापर्यंत एवढीच माहिती मिळाली असून सविस्तर माहिती नंतर कळवण्यात येईल. 

नेमकं काय घडलं? 

बेस्ट प्रशासनाची 66 क्रमांकाची बस बॅलार्ड पियरच्या दिशेनं  राणी लक्ष्मीबाई चौक सायन इथे जात होती. या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. त्यानंतर तो प्रवासी बसमधील चालकाशी हुज्जत घातल होता. लालबाग येथील गणेश टॉकीज परिसरात बस पोहोचली आणि तेवढ्या त्या प्रवाशानं अचानक स्टेअरिंग पकडलं. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित बसनं दोन मोटारसायकल, एक कार आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आतापर्यंत नऊजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील तीन जण गंभीर जखमी आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर बेछुट गोळीबार, नंतर कोयत्यानं वार; पोलीस सह आयुक्तांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget