एक्स्प्लोर

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर बेछुट गोळीबार, नंतर कोयत्यानं वार; पोलीस सह आयुक्तांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

NCP Corporator Vanraj Andekar Shot In Pune: वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केल्याचं बोललं जात आहे.NCP Corporator Vanraj Andekar Shot In Pune

Pune Crime News : पुणे : सुसंस्कृत पुण्यात (Pune News) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या खरंच ऐरणीवर आला आहे. पुण्यात (Pune Crime) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक वनराज आंदेरकर (NCP Corporator Vanraj Andekar) यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एवढंच नाहीतर गोळीबारानंतर वनराज आंदेकरांवर कोयत्यानं सपासप वारही केले. हल्लेखोरांनी आंदेरकरांवर तब्बल पाच गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. दरम्यान, वनराज आंदेकर  हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 

वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केल्याचं बोललं जात आहे. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले. हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखा दाखल झाली आणि त्यांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलीस प्रत्येक धागेदोरे कसून तपासत आहेत. 

नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितलं... 

पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की, रविवारी संध्याकाळी (2 सप्टेंबर) साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेणं हे शोधण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलेले आहेत.

पुण्यातील गोळीबाराचा A टू Z घटनाक्रम 

पुण्यातील मध्यभागात रविवारी गोळीबाराचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं. वनराज आंदेकर या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. वनराज आंदेकराची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केली. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

गोळीबार करून कोयत्यानं वार केल. आधी चौकातले लाईट घालवले. आणि एकटा असल्याचं पाहून हल्ला केला. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget