एक्स्प्लोर
Advertisement
Lalbaugcha Raja LIVE : घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचं लाईव्ह दर्शन, यंदा राजाचा 'आरोग्योत्सव'
Lalbaugcha Raja LIVE : लालबागच्या राजाचं दर्शन 24 तास आपण ऑनलाईन घेऊ शकणार आहोत. यासाठी लालबागच्या राजाच्या Lalbaugcha Raja या यू ट्यूब चॅनलवर आपल्याला जावं लागणार आहे.
Ganesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीचं पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरं करण्यात येत आहे. यंदा मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितार्थ निर्णय घेतला आहे. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणपती बाप्पाचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईत देखील मानाच्या गणराजाच्या दर्शनासाठी दरवर्षी रांगा लागतात. सिद्धीविनायक, लालबागचा राजासह अनेक प्रमुख मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त लांबून येतात. बाप्पाचं आगमन झालं की मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाकडे भक्तांची पावलं वळतात. हजारोंच्या संख्येनं भाविक लालबागच्या राजा चरणी लीन होण्यासाठी येतात. मात्र यंदा कोरोनामुळं भाविकांना बंधनं आलीत.
तरीही लालबागच्या राजाचं दर्शन 24 तास आपण ऑनलाईन घेऊ शकणार आहोत. तसेच रोज गणेश आरतीचा देखील लाभ भाविक घेऊ शकणार आहेत. यासाठी लालबागचा राजा मंडळाच्या Lalbaugcha Raja या यू ट्यूब लाईव्हवर आपल्याला जावं लागणार आहे.
लालबागच्या राजाचं दर्शन 24 तास ऑनलाईन पाहा इथं
यंदा लालबागच्या राजाचा गणपती नाही; लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोना संकट असल्यानं मंडळायाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. 11 दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तसेच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळानं ऐतिहासिक निर्णय घेत आरोग्यसेवा करणार असल्याचं सांगितलं आहे. लालबागच्या राजाची ख्याती खुप मोठी आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, क्रेिकेटपटू या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. एवढचं नाहीतर देशविदेशातून लोकं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. पण यंदा हा उत्सव होणार नाही. गणेशोत्सवात लालबागमध्ये लाखो भाविक येत असतात गर्दीत कोरोनाची लागण असलेल्यांचा वावर आला तर कित्येकांना यांची लागण होऊ शकते आणि परिणामी शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो तसेच कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढू शकतो त्यामुळेच सणासुदीला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement