एक्स्प्लोर

Sea-Bridge Marathon : अटल सेतूवरून सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात, अभिनेता अक्षय कुमारसर टायगर श्रॉफची हजेरी

Atal Setu Marathon : मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) म्हणजे अटल सेतू शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14 तासांसाठी बंद असेल.

L&T Sea-Bridge Marathon : देशातील पहिला सागरी पूल असलेल्या अटल सेतूवरून (Mumbai Trans Harbour Link) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीएच्या सहयोगाने लार्सन आणि टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला (Sea-Bridge Marathon) सुरुवात झाली आहे. नवी मुंबईमधील (Navi Mumbai) प्रवास सुलभ करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा (Atal Bihari Vajpayee Trans Hbr Link) अटल सेतूवर (Atal Setu) आज, रविवारी 'द टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'एमएमआरडीए'च्या सहयोगाने लार्सन अँड टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सागरी पुलावरील ही पहिली मॅरेथॉन असून 42 किमी, 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशी मॅरेथॉन पार पडणार आहे.

अटल सेतूवरून सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात

रविवारी सकाळपासूनच या मॅरेथॉनला धावपटूंनी मोठी उपस्थिती लावली आहे, या मॅरेथॉनमुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अटलसेतूवरील मार्गात बदल करण्यात आला आहे. यासह, वाहतूक पोलीस आणि पोलिसांनीही पुरेशी तयारी केली आहे. या मॅरेथॉनला बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. अटल सेतूवर अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने बाईक चालवत एन्ट्री केली.

अभिनेता अक्षय कुमारसह टायगर श्रॉफची हजेरी

सी-ब्रीज मॅरेथॉनमध्ये धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचं दिसत आहे. सकाळी सहा वाजता 21 किमी मॅरेथॉनला सुरुवात झाली. सकाळी सहाच्या मॅरेथॉनला टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची उपस्थिती असून अक्षय कुमार यांच्या हस्ते धावपटूंना हिरवा झेंडा दाखवला जात आहे.

अटल सेतूवर वाहनांना परवानगी नाही

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) म्हणजे अटल सेतू शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14 तासांसाठी बंद असेल. रविवारी सकाळी अटल सेतूवर L&T सी ब्रिज मॅरेथॉन 2024 आयोजित करण्यात आल्याने अटल सेतू बंद ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी X वर पोस्ट करत सांगितलं आहे की, या दरम्यान अटल सेतूवर वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.

14 तासांसाठी अटल सेतू बंद

मुंबई पोलिसांनी पोस्ट केले आहे की, रविवार 18 फेब्रुवारी रोजी गाडी अड्डा मुंबई ते चिर्ले नवी मुंबई या अटलसेतू (MTHL) मार्गाच्या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पुढील व्यवस्था करण्यात येणार आहे.  या कालावधीत कोणत्याही वाहनांना अटल सेतूवरून (Atal Setu) परवानगी दिली जाणार नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील निवासी डॉक्टरने संपवलं जीवन, मानसिक तणावात असल्याची माहिती
धक्कादायक! मुंबईतील निवासी डॉक्टरने संपवलं जीवन, मानसिक तणावात असल्याची माहिती
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget