एक्स्प्लोर
कुर्ल्यातील शितल सिनेमागृहाच्या इमारतीच्या पिलरशी छेडछाड
कुर्ल्यातल्या शितल सिनेमागृहाच्या पिलरशी छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. पण, महापालिकेने यावर इमारत मालकाला नोटीस पाठवण्याच्या व्यतिरित्त कोणतीही कारवाई केली नाही.

मुंबई : घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेला ज्याप्रमाणे पिलरशी केलेली छेडछाड कारणीभूत ठरली, तसाच प्रकार आता कुर्ल्यातल्या शितल सिनेमागृहात घडलाय. इथेही इमारतीच्या पिलरशी छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. पण, महापालिकेने यावर इमारत मालकाला नोटीस पाठवण्याच्या व्यतिरित्त कोणतीही कारवाई केली नाही. कुर्ल्यातील भर गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या शितल सिनेमागृहाच्या इमारतीच्या पिलरशी छेडछाड करण्यात आली आहे. यामुळे ही इमारत अधिकच धोकादायक बनली असून, या इमारतीचा काही भागही कोसळला आहे. विशेष म्हणजे, या इमारतीच्या खाली शितल बार आणि रेस्टॉरंटही सुरु आहे. या इमारतीची तपासणी करुन महापालिकेनं हे सिनेमागृह तात्काळ बंद तर केलंय. मात्र भर गर्दीच्या रस्त्यावर असणारी ही इमारत आजुबाजूच्या नागरिकांसाठी धोरादायक ठरु शकते. दरम्यान, या इमारतीच्या शेजारी छत्रपती शिवाजी तलाव आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दीही होते. त्यामुळे या इमारतीवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक असताना, केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. ''शितल सिनेमागृहाची इमारत तत्काळ जमीनदोस्त करण्याची आवश्यक्ता असताना, मुंबई महापालिका नोटीस बजावून आपले हात झटकत आहे. जर या परिसरातही घटकोपर सारखी दुर्घटना घडल्यास, याची जबाबदारी कुणाची,'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















