एक्स्प्लोर
निरंजन डावखरेंविरोधात शरद पवार मैदानात
निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रिंगणात उतरले आहेत.
मुंबई: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने तयारीला लागली आहे. निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या निरंजन डावखरे यांचं आव्हान आहे.
या निवडणुकीच्या रणनीतीसाठी बुधवारी म्हणजेच उद्या पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार बैठकीला संबोधित करणार आहेत.
नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक,जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
‘गद्दारांना धडा शिकवू’
दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्या निरंजन डावखरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गद्दारांना धडा शिकवू असा पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे मैदानात आहेत.
आता राष्ट्रवादी काँग्रेसने नजीब मुल्ली यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून मतदान होणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम
निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून 2012 मध्ये निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ 7 जुलै 2018 रोजी संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानुसात आता पदवीधर निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार आहे, तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या
हितेंद्र ठाकूरांचा पाठिंबा घेऊ, गद्दारांना धडा शिकवू: राष्ट्रवादी
पालघरचा वचपा, कोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेनेची उडी
निरंजन डावखरेंविरोधात आव्हाडांचा कट्टर समर्थक मैदानात
मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या....
निरंजन डावखरेंच्या भाजपप्रवेशाची 'इन्साईड स्टोरी'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement