मुंबई महापालिका कोविड19 मुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवतेय : किरीट सोमय्या
मुंबई महापालिका कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवत असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे सरकारचं अपयश लपवण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका करत आहे : सोमय्या

मुंबई : कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा मुंबई महापालिका लपवत असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मे 2019 मध्ये मुंबईत 7335 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. तर मे 2020 मध्ये 14 हजार 82 मृत्यू झाल्याची नोंद पालिकेच्या डेथ रजिस्टरमध्ये झाली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि विरोधकांना नेहमी कोंडीत धरण्याचा प्रयत्न करणारे किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महापालिका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारात मुंबई महापालिकेकडून 2019 आणि 2020 मध्ये मृत्यू झालेले आकडे मागितले होते. ज्यामध्ये 14 हजार 82 मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून मिळाली. ज्यामध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 984 असल्याचं उपलब्ध झालेल्या माहितीवरून दिसत असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. म्हणजे मुंबईमध्ये मे 2020 मध्ये अन्य मृत्यू 13 हजार 98 एवढे झाले तर 2019 व 2020 मधील मासिक मृत्यूचे प्रमाण पाहिले तर मुंबई शहरात कोविड वगळता अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सरासरी सात ते आठ हजार असल्याचे दिसत आहे, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांचे धरणे आंदोलन
मे महिन्यात कडक लॉकडाऊन होता. या काळात अपघाती मृत्यू झालेले नाहीत, असे असतानाही मृत्यूची संख्या एवढी कशी वाढली? याचं उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक दिलं नसल्याचं मत किरीट सोमय्या यांनी सांगितलं. हे आकडे लपवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ज्या भागात मे 2020 मध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली. तो भाग महापालिकेचा ई वॉर्ड, एफ दक्षिण, एफ उत्तर, के वेस्ट, एन वॉर्ड असे आहेत. त्यामुळे कोणत्या कारणामुळे मृत्यूंच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली? याची चौकशी महापालिकेने करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Mumbai | BEST Bus | राज्य सरकारचा मुंबईकरांना दिलासा! बेस्ट बसेस पूर्ण क्षणतेनं चालवण्यास परवानगी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
