एक्स्प्लोर
हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेला मुंबईतील कामाठीपुऱ्यातील गणेशोत्सव
मंडळाचे उपाध्यक्ष मुस्लीम आहेत. मोहरमनिमित्त हिंदू बांधव फातिमा बीबीला चादर चढवतात, तर मुस्लीम बांधव गणपतीची आरती करतात.

मुंबई : तुमच्या-आमच्या गणेशोत्सवासारखाच उत्सव मुंबईतील कामाठीपुरातही साजरा केला जातो. देहविक्री करणाऱ्या महिलाही यामध्ये सहभाग घेतात, तर या मंडळाचे उपाध्यक्ष मुस्लीम आहेत. मोहरमनिमित्त हिंदू बांधव फातिमा बीबीला चादर चढवतात, तर मुस्लीम बांधव गणपतीची आरती करतात. हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणता येईल असा हा गणेशोत्सव आहे.
फारुख जाफर शेख हे लहानपणापासून कामाठीपुरातच वाढले. जसा रोजा ठेवतात तसा गणपती आला की दहा दिवस त्यांचा उपवास असतो आणि अनवाणी फिरतात. कामाठीपुरात अकरावी गल्ली मंडळात ते सेवा करतात.
कामाठीपुरात अकराव्या गल्लीत मंडळाचे अध्यक्ष हिंदू, तर उपाध्यक्ष मुस्लीम आहेत. या भागातील महिलाही गणेशोत्सवात सहभागी होतात. मोहरम सुरू असल्याने हिंदू धर्मीय फातिमा बीबीला चादर चढवतात.
सण कोणताही असो धर्म, जात भेद नाही. बापाच्या स्वागतासाठी, पाहुणचारासाठी सर्व जण एकत्र येतात. कामाठीपुरा म्हटल की मुंबईतील पांढरपेशा समाजाला वर्ज्य असा हा भाग. पण बाप्पा इथेही येतो हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक बनतो.


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
