एक्स्प्लोर
Advertisement
कमला मिल आग: शरण आलेल्या युग तुलीला बेड्या
युग तुली काही दिवसांपूर्वी हैदराबाद विमानतळावर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता.
मुंबई: कमला मिल आगप्रकरणी अखेर मोजोज बिस्त्रो पबचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली. 14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कमला मिल आगप्रकरणी युग तुली प्रमुख आरोपींपैकी एक होता.
मात्र गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण तो अर्ज फेटाळल्यानंतर युग तुली गायब होता. अखेर त्याने काल रात्री ना म जोशी मार्ग पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शरण आलेल्या युग तुलीला पोलिसांनी अटक केली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल.
कमला मिल्स आग : 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक
याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर अनधिकृत बांधकाम, अग्निशमनचे नियम धाब्यावर बसवण्यासह अनेक आरोप आहेत.
विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?
कमला मिल आगप्रकरणी कोणाकोणाला अटक?
- कृपेश संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)
- जिगर संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)
- अभिजीत मानकर (हॉटेल वन अबव्ह) (11 जानेवारी सकाळी)
- विशाल कारिया (आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप) (9 जानेवारी सकाळी)
- युग पाठक (मोजोस बिस्त्रोचा दुसरा मालक)
- युग तुली (मोजोस बिस्त्रोचा मालक) (15 जानेवारी रात्री)
- केविन केणी बावा (मॅनेजर, 'वन अबव्ह'- 1जानेवारी )
- लिसबन स्टेनील लोपेज (मॅनेजर, 'वन अबव्ह'- 1 जानेवारी )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement