एक्स्प्लोर

Kalyan : कल्याण आरटीओ कर्मचारी मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन, गुन्हा दाखल करण्याची मागणी

कल्याण आरटीओ कार्यालयात थुंकण्यास मज्जाव करणाऱ्या आरटीओ कर्मचाऱ्याला एका एजंटने मारहाण केली होती. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

कल्याण : कार्यालयात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला एका एजंटने मारहाण केल्याची घटना कल्याण आरटीओ कार्यालयात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एनसी दाखल केली होती. दरम्यान, आज कल्याण आरटीओमध्ये कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी या मारहाणीच्या  घटनेचा निषेध नोंदवला. मारहाण करणाऱ्या विरोधात कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली.
     
मंगळवारी दुपारच्या सुमारास कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी आलेला मच्छिंद्र केणे हा कार्यालयातच थुंकला. यामुळे कल्याण आरटीओमध्ये कार्यरत असलेले लिपिक मनीष जाधव यांनी त्याला हटकले आणि त्याला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या केणे याने मनीष यांना धमकी दिली. इतकेच नव्हे तर कार्यालयीन कामकाज आटोपून संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष याला केणे याने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली. 

या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीनुसार एनसी दाखल केली होती. या मारहाणीच्या घटनेमुळे कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आज कल्याण आरटीओमध्ये मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कल्याण आरटीओमधील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं. अशा घटना सतत घडत असल्याने सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Vijay Wadettiwar: अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, काँग्रेसवर परभवाचे खापर; विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..
Pune Crime: मला शुभदाला ठार मारायचं नव्हतं; पुण्याच्या आयटी कंपनीतील तरुण पोलीस चौकशीत काय म्हणाला?
पुण्याच्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारेची चाकूचे वार करुन हत्या, आता मारेकरी म्हणतो...
Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'
Same Sex Marriage : समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
समलिंगी विवाहावरील पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'केंद्र सरकारने समलैंगिकांच्या हक्कांसाठी...'
Embed widget