Mumbai Nashik Local : मुंबई-नाशिक आता लोकलनं गाठता येणार, कल्याण-नाशिक दरम्यान मेमू लोकलची चाचणी डिंसेबरमध्ये
Mumbai Nashik Local : नाशिक-कल्याण दरम्यान मेमू (Main Electrical Multipurpose Unit) लोकलची चाचणी डिसेंबरमध्ये होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी मेमू लोकल सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
नाशिक : मुंबई-नाशिक प्रवास लोकलनं करण्याचं नाशिककरांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये नाशिक-कल्याण दरम्यान मेमू (Main Electrical Multipurpose Unit) लोकलची चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी मेमू लोकल सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे या लोकलसाठी प्रयत्न करत आहेत. (Test of Memu local between Kalyan-Nashik).
नाशिक-मुंबई प्रवासासाठी सध्या राज्यराणी, पंचवटी आणि आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा रेल्वे आहेत. आता लोकल सुरू झाली तर त्याचा फायदा शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, चाकरमानी, व्यावसायिकांनाही होणार आहे.
नाशिक-कल्याण मेमू लोकल रेल्वेसेवेचा मुद्द्या गेल्या लोकसभेवेळीही प्रमुख बनला होता. मात्र आता मेमू लोकल मंजूर झालेले असून यासाठी ट्रायल होणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी या लोकलसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ट्रायलसाठी निधीची तरतूद रेल्वेकडे उपलब्ध असून पुढच्या महिन्यात ट्रायलचे संकेत रेल्वेच्या सूत्रांनी दिले आहेत. ही ट्रायल यशस्वी झाल्यास नव्या वर्षात नाशिक-कल्याण मेमू लोकल सुरू होईल.
नाशिक-कल्याण मेमू लोकल सुरु झाल्यास नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. नाशिकची कनेक्टिविटी वाढून उद्योग-व्यवसाय, शेती, आरोग्य या क्षेत्रात काम करायला संधी मिळणार आहे. तसेच चाकरमान्यांचा प्रश्न मिटणार असून महिलांनाही सुखकर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळ रेल्वेने आता फास्ट ट्रॅकवर ही ट्रायल करावी अशी मागणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :