Kalyan News : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वादाला राजकीय स्वरूप; शिवसेना मनसे आमने-सामने
Kalyan News : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वादाला राजकीय स्वरूप आलं आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे आमने-सामने आले आहेत.
Kalyan News : कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना मनसे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एक ही संधी सोडताना दिसत नाही. यावेळी निमित्त आहे ते ठाणे डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोकाशी पाडा येथे जमिनीवरून झालेल्या वादाचे. या मोकाशी पाडा येथे जमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंबावर शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मारहाण करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत डायघर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर शिवसेनेच्या दबावामुळे गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप केला. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात केडीएमसीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह इतर 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच म्हात्रे यांच्या चालकाच्या तक्रारीनुसार, शेतकरी कुटुंबीयावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या वादानं आता राजकीय रंग घेतला आहे. याबाबत रमेश म्हात्रे यांनी आरोपांचे खंडन करत मनसे आमदार राजू पाटील यांना लक्ष केलं. कोणालाही आमच्याकडून मारहाण करण्यात आली नाही. शेतकरी कुटुंबाला आजी माजी आमदारांनी भडकवलं. आमदारांचं काम विकास कामं करणं आहे. भांडण मिटवणं आहे, अशा पद्धतीचं कृत्य करणं त्यांचं काम नाही, अशी टीका मनसे आमदारांवर करण्यात आली. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी माझा मतदार संघ आहे. माझा लोकांवर अन्याय होत असताना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकू नये, तर मी आमदार कसा? मी शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी आहे, असा पलटवार म्हात्रे यांच्यावर केला आहे. दरम्यान जमिनीवरून झालेल्या वादाचं आता राजकीय वादात रूपांतर झाल्याचं दिसून येत आहे.
काय होतं प्रकरण?
3 फेब्रुवारीच्या रात्री मोकाशी पाडा येथील जमीनीच्या वादातून शेतकरी एकनाथ मोकाशी यांच्या कुटुंबांवर हल्ला करण्यात आला. जमीन घेण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह शेतकरी कुटुंबीयांवर हल्ला केला गेला होता, असा आरोप शेतकरी कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात पोलीस तक्रार घेत नसल्यानं मनसे आमदार राजू पाटील यांनी डायघर पोलीस ठाण्यात मोकाशी कुटुंबीयांसह सहा तास ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी चार दिवसांनी म्हात्रे यांच्यासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र म्हात्रे यांच्या चालकाच्या तक्रारीनुसार, शेतकरी कुटुंबीयांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक म्हात्रे यांनी आमच्याकडून कोणाला मारहाण करण्यात आली? जे जखमी झाले, ते कशामुळे जखमी झाले? हे आम्हाला माहीत नाही. मात्र आजी-माजी आमदारांनी भडकवल्यानं शेतकरी खोटं बोलत आहेत आणि पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली आहे. मनसे आमदारानं सहा तास ठिय्या दिला. त्यांच्या मदतीला शिवसेनेचे माजी आमदार गेले. आमदारांचे काम विकास काम करावं, लोकांचं भांडण मिटविणं असतं, असं कृत्य करणं ही त्यांची कामं नाहीत, अशी टीका रमेश म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली. पुढे बोलताना लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. त्यांनी चांगली कामे करावीत, असा हल्लाबोल म्हात्रे यांनी केला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रत्युत्तर https://marathi.abplive.com/topic/MNS
मनसे आमदार राजू पाटील यांनी आमच्या लोकांवर अन्याय होत असेल, दबवाखाली पोलीस गुन्हा दाखल करीत नसतील तर मी दबाव टाकू नये तर मी आमदार कसला? अस सवाल केला आहे. शंभर टक्के मी पीडित शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जागेमध्ये कोणाचा काय फायदा आहे? हे मला माहिती नाही. केवळ शेतकरी कुटुंबीयांवर अन्याय झाला. त्यांच्या मदतीला गेलो. मी कोणाचं नाव पण घेतलं नाही. इतका गंभीर गुन्हा दाखल असताना. ते प्रेस घेत आहेत. उद्या त्यांचा गुन्हा पण कमी केला जाईल, पिडीत शेतकरी कुटुंबाला कायदेशीर मदत लागल्यास ती करणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं, म्हात्रे यांनी मला मनसे आमदारांनी अडकवल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी जे स्वतःच 9 ते 10 गुन्ह्यात अडकले आहेत, त्यांना मी काय अडकवणार? असा पलटवार केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TMC Budget : पेपर फुटीनंतर आता ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प देखील फुटला?
- BMC New Wards : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली वॉर्ड पुर्नरचना वादाच्या भोव-यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha