एक्स्प्लोर
दोन वेण्या न घातल्याने विद्यार्थिनीला मारहाण, मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा
मात्र यामुळे भक्ती म्हात्रे या विद्यार्थिनीचे हात सुजले आणि तिला त्रास सुरु झाला. यानंतर तिच्या वडिलांनी थेट बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली.
![दोन वेण्या न घातल्याने विद्यार्थिनीला मारहाण, मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा Kalyan : Girl beaten up by Principal for not tying hair and wearing shoes दोन वेण्या न घातल्याने विद्यार्थिनीला मारहाण, मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/22154052/Punishment.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधीक फोटो
कल्याण : शाळेत येताना दोन वेण्या आणि कॅनव्हासचे शूज घातले नाहीत, म्हणून मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणच्या टिळक चौक भागात असलेल्या ओक हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला.
या शाळेत आठवीत शिकणारी भक्ती म्हात्रे ही विद्यार्थिनी काल (बुधवार) शाळेत येताना एक वेणी आणि चप्पल घालून आली. शाळा सुरु असताना मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी या वर्गात राऊंडला आल्या आणि त्यांनी नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून दोन दोन छड्या मारल्या.
मात्र यामुळे भक्ती म्हात्रे या विद्यार्थिनीचे हात सुजले आणि तिला त्रास सुरु झाला. यानंतर तिच्या वडिलांनी थेट बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीनुसार मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मेधा कुलकर्णी यांना याबाबत विचारलं असता, आपण शाळेची शिस्त बिघडू नये यासाठी मुलांना शिक्षा केल्याचं सांगितलं.
शिवाय मुलींनी जर शिस्त पाळली नाही, तर बाहेर त्याचा मुलींनाच त्रास होऊ शकतो. त्यामुळे आईच्या अधिकाराने आपण दोन धपाटे घातले. मात्र यामागे काहीही चुकीचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरणही कुलकर्णी यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)