एक्स्प्लोर

रात्री साडेअकरा वाजता मुख्यमंत्री चक्क बोटीनं डोंबिवलीत, दहीहंडी उत्सवाला हजेरी; म्हणाले...

Kalyan Dombivli News : दहीहंडी उत्सव तर उत्साहात साजरी झाला आता गणेशोत्सव व नवरात्रउत्सव उत्साहात साजरा होणार, मुख्यमंत्र्यांचा गोविदांसोबत संवाद.

Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल (शुक्रवारी) डोंबिवली (Dombivli) येथे दीपेश म्हात्रे फाऊंडेशन तर्फे आयोजित दहीहंडी (Dahi Handi) महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, "एकदम आवाज कमी करा, फक्त गोविंदांना इथल्या लोकांना ऐकायला येईल इतकाच ठेवा, नियम आपल्याला पाळायचे आहेत. सर्व गोविंदांच मनापासून स्वागत करतो.", असं बोलत भाषणाला सुरुवात केली. यावेळी शिंदे यांनी यंदा दोन वर्षानंतर साजरा होणारा या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचं सांगितलं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणार. संस्कृती परंपरा जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, दीड महिन्यांत तब्बल सातशे निर्णय घेतले, असे शिंदे यांनी सांगितलं. पुढे बोलताना शिंदे यांनी दहीहंडी उत्सव तर उत्साहात साजरा झाला. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार असं सांगितलं. दरम्यान डोंबिवलीत दहीहंडी उत्सवाला येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री साडे अकरा वाजता भरपावसात मानकोली वेलेगाव ते  डोंबिवली मोठागाव गणेश घाट दरम्यान बोटीने प्रवास केला .

डोंबिवली पश्चिमेकडे सम्राट चौकामध्ये फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, रात्री साडे अकरा वाजता एकनाथ शिंदे यांनी मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाटापर्यंत बोटीनं प्रवास करत कार्यक्रम स्थळ गाठलं. कार्यक्रमास मुख्यमंत्री येणार असल्याने डोंबिवली शहरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवलीत आलं होतं. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदे यांचा जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक तथा महोत्सवाचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव होतोय सरकारने देखील पूर्णपणे मोकळीक दिली, अत्यंत उत्साहात सन साजरा होतोय याचं मला समाधान  वाटतंय, आनंद होतोय, मी ज्या ठिकाणी  गेलो त्या त्या ठिकाणी प्रचंड उत्साह दिसून येतोय अस सांगितलं. पुढे बोलताना हे सरकार तुमचं आमचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. प्रत्येकाला वाटतं हे माझं सरकार आहे. आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, हा फरक  या गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळतोय अनुभवला मिळतो ही चांगली बाब असल्याचे सांगितलं. 

मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात कारण आज तुमच्यातलाच एकनाथ शिंदे येथे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. पुढे बोलताना गोविंदांना उद्देशून बोलताना तुम्ही हंड्या खूप फोडल्या, आम्ही पण दीड महिन्यापूर्वी 50 जणांची हंडी फोडली. मुंबई सुरत गुहाटी पण होतं, असा टोला लगावला. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार स्थापन झालंय. गोविंदासाठी निर्णय घेतलेत, शेवटी सरकार लोकांचं आहे. लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. म्हणून, जे काही तुम्हाला हवंय, या जनतेला हे पाहिजे जे जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा काम एक-दीड महिन्यांमध्ये करतोय. जे मागच्या अडीच वर्षात झालं नाही ते दीड महिन्यांमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तब्बल सातशे निर्णय घेतल्याच मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. सण उत्सवाबाबत आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्यासाठी घेतलाय. दहीहंडी उत्सव तर उत्साहात साजरा केलाच आहे. पण येथे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव देखील मोठ्या धुमधडाका साजरा करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आमचं सर्वसामान्य लोकांचं सरकार नक्की करेल : मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी डोंबिवली तालुक्यात आलोय. लवकरच मी पुन्हा डोंबिवलीत येईल कल्याण डोंबिवलीचे प्रश्न आहेत. ते नक्की आम्ही सोडवू. मी आहे, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत, मंत्रिमंडळ आहे, चांगलं काम करण्याची संधी सरकारला मिळाली आहे. राज्याचा सर्वांगीण विकास सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आमचं सर्वसामान्य लोकांचं सरकार नक्की करेल असं सांगितलं. 

बोट चांगली होती सुरक्षित पोहचलो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रात्री साडे अकरा वाजता भर पावसात बोटिनं केलेल्या प्रवासाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बोट चांगली होती. सुरक्षितपणे आलोय, या ठिकाणी पोहोचलोय, अशी मिश्किल प्रतिक्रिया देतानाच खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावंच लागतं, अस सांगितलं .

उत्सव साजराचा करण्याच्या बाबतीत सरकारने खूप लवचिक धोरण स्वीकारलं : मुख्यमंत्री 

यावर्षी जल्लोषात उत्साहात गोविंदा बाहेर पडलेले आहेत. गेली दोन वर्षे कोविडमुळे सर्व उत्सव सणांवर मर्यादा होत्या. यावर्षी मात्र सर्व गोविंदांनी सगळी कसर भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई ठाणे कल्याण भिवंडी सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये राज्यभरात मोठा उत्साह दिसून आला. आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम हे सगळे लोक करतायत आणि यावर्षी शिवसेना भाजपाचे युतीच्या सरकारनं गोविंदाच्या बाबतीत देखील किंबहुना गणेशोत्सव साजराचा करण्याच्या बाबतीत देखील खूप लवचिक धोरण स्वीकारलं आहे. यंदा दही हंडी उत्सवात उत्साह दांडगा आहे, सर्व तरुणांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवलीत दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवासाठी आले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे बोटीनं प्रवास केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget