एक्स्प्लोर
रिक्षाचालकाची मुजोरी, तरुण आणि त्याच्या बहिणीला शिवीगाळ
या प्रकाराने रिक्षाचालकांचा मुजोरपणा आणि उद्दामपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे आता या रिक्षाचालकावर कारवाई कधी होते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कल्याण : एका मद्यधुंद रिक्षाचालकाने तरुण आणि त्याच्या बहिणीसोबत उद्धट वर्तन केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कल्याण शहरात संताप व्यक्त होत आहे.
ठाण्याच्या एका नामांकित कंपनीत काम करणारा गौरव भारद्वाज हा तरुण गुरुवारी सायंकाळी कल्याण स्थानकाच्या पश्चिम भागातून पूर्वेतील लोकग्राम भागातील घरी जाण्यासाठी निघाला. बहिण सोबत असल्याने त्याने एसटी डेपो समोरुन शेअर रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालक नशेत होता आणि तो अतिशय वेगात रिक्षा चालवत होता. त्यामुळे गौरव आणि रिक्षातील इतर प्रवाशांनी त्याला रिक्षा हळू चालवण्याची सूचना अनेकदा केली. मात्र रिक्षाचालक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसात तक्रार करण्याच्या धमकीलाही तो बधत नव्हता.
अखेर गौरव आणि त्याची बहिण मेट्रो जंक्शन मॉलजवळ उतरले आणि सुट्टे पैसे नसल्याने गौरव ते आणण्यासाठी गेला. मात्र तितक्या वेळात या रिक्षाचालकाने गौरवच्या बहिणीसोबत गैरवर्तन केलं. हा सगळा प्रकार गौरवच्या बहिणीने मोबाईलमध्ये चित्रित केला आणि सोशल मीडियावर टाकला.
अल्पावधीत मुंबईपर्यंत हा व्हिडीओ शेअर झाला आणि मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी गौरवने शुक्रवारी रात्री उशिरा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.
या प्रकाराने रिक्षाचालकांचा मुजोरपणा आणि उद्दामपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे आता या रिक्षाचालकावर कारवाई कधी होते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement