एक्स्प्लोर
मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना न्यायालयीन कोठडी

मुंबईः मनसेचे मुंबई महापालिकेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालिकेच्या अभियंत्यांना धमकवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी स्वतःहून दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. पोलिसांनी दिलेला जामीन नाकारल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोघांनाही 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. अभियंत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या दोन्ही नगरसेवकांवर करण्यात आला आहे. तसेच त्यांचा रस्ता अडवल्याचाही आरोप पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
आणखी वाचा























