एक्स्प्लोर
'जेजे'च्या डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, रुग्णांचे हाल
चार दिवसांपूर्वी निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं. मात्र डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांची परवड होताना दिसत आहे.
मुंबई : जेजे रुग्णालायातील निवासी डॉक्टर आज सलग चौथ्या दिवशी संपावर आहेत. चार दिवसांपूर्वी निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं. मात्र डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांची परवड होताना दिसत आहे.
जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत जेजे रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
संपकरी डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांची काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली. मात्र सुरक्षेसंबंधी मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं संपकरी डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडीओ ही समोर आला आहे.
या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच
जे जे हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement